---Advertisement---

पुणे महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांच्या 153 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

पुणे महानगरपालिका
---Advertisement---

Pune Municipal Corporation Bharti पुणे महानगरपालिकेअंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 02 ऑगस्ट 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा : 153

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक – 54
शैक्षणिक पात्रता :
माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रधारक व शिक्षणशास्त्र पदविका (डी. एड/बी. एड) उर्दू माध्यम, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण. 01) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. 02) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास गुणानुक्रमे अन्य उमेदवारांना संधी देण्यात येईल.

2) विशेष शिक्षक- 02
शैक्षणिक पात्रता :
माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र धारक व बौद्धिक अक्षम प्रवर्गातील प्रशिक्षित पदविका, डी.एस.ई. (आय डी) व आर सी आय नोंदणी प्रमाणपत्र धारक.

3) इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक- 97
शैक्षणिक पात्रता :
01) इयत्ता 1ली ते 12 वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड./बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण 02) इयत्ता 1ली ते 10 वी पर्यंत इंग्रजी, 12वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड. बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण 03) इयत्ता 1ली ते 10 वी मराठी अथवा इतर माध्यमातून व 12वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड./ बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण 04) इयत्ता 1ली ते 12 वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण अ) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. ब) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास गुणानुक्रमे अन्य उमेदवारांना संधी देण्यात येईल.

इतका पगार मिळेल?
उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक Rs. 20,000/
विशेष शिक्षक Rs. 20,000/-
इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक Rs. 20,000/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता –
उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक – शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे ०५
विशेष शिक्षक – विशेष मुलांची शाळा, मनपा शाळा क्र १४ मुलांची, काँग्रेस भवनमार्ग, शिवाजीनगर, पुणे ५
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

जाहिरात क्रमांक 1 (Notification No. 1) : येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक 2 (Notification No. 2) : येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक 3 (Notification No. 3) : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now