खरंतर असे कोणतेही क्षेत्र नाही की ज्यात मुली अग्रेसर नाहीत. प्रत्येक क्षेत्रात मुलींच्या कार्याची छाप दिसून देते. तसेच, भारतीय सैन्यदलात निवड झालेल्या मेजर राधिका सेन यांची जीवनकहाणी ही देखील अनेक मुलींसाठी आदर्शवत आहे.मेजर राधिका सेन या मूळच्या हिमाचल प्रदेशातील सुंदरनगर तालुक्यातील भडोह वार्डातील रहिवासी आहेत.राधिका सेन यांचे वडील ओंकार सेन हे सरकारी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, हमीरपूर येथून प्राचार्य पदावरून निवृत्त झाले आहेत.
तर आई निर्मला सेन या चौहार व्हॅलीच्या कथोग शाळेतून शिक्षिका पदावरून निवृत्त झाल्या आहेत. आपल्या मुलीने उच्च शिक्षण घेऊन उच्च पद मिळवावे ही त्यांच्या आई – वडिलांची इच्छा होती. सुंदर नगर येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मेजर सेन उच्च शिक्षण घेण्यासाठी चंदीगडला गेले. त्यांनी बायोटेक्नोलॉजी इंजीनिअरींगच्या शिक्षणानंतर आयआयटी मुंबई (IIT Bombay) येथून मास्टर्सचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी बऱ्याच स्पर्धा परीक्षा दिल्या. त्यावर त्यांची त्या आठ वर्षांपूर्वी भारतीय सैन्यदलात भरती झाल्या होत्या. त्या इंडियन रॅपिड डिप्लॉयमेंट बटालियनच्या टीम कमांडर देखील होत्या.
तसेच, त्यांनी नेतृत्वाखाली, संघाने महिलांचे आरोग्य, शिक्षण, मुलांची काळजी, लैंगिक समानता आणि रोजगार या विषयांवर शैक्षणिक सत्रे देखील घेतली आहेत. त्यामुळेच, भारतीय लष्कराच्या मेजर राधिका सेन यांना संयुक्त राष्ट्राने सन्मानित केले आहे. तसेच, २०२३साली ‘यूएन मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. युनायटेड नेशन्स पीस मिशनमध्ये लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्यांना हा सन्मान दिला जातो. त्यांच्या त्या मानकरी आहेत. त्यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने हिमाचल प्रदेशसह संपूर्ण देशाचे नाव मोठे केले आहे.