Raigad DCC Recruitment 2024 : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरतीची जाहिरात निघाली आहे. लिपिक पदासाठी ही भरती होणार असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 200
रिक्त पदाचे नाव : लिपिक / Clerk
शैक्षणिक पात्रता : i) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवीधर असावा. ii) उमेदवार एम.एस.सी.आय.टी किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान ९० दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा. (संगणक पदवी असल्यास अट शिथिल)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १४ ऑगस्ट २०२४ रोजी, २१ ते ४२ वर्षे
परीक्षा फी : ५९० /- रुपये]
पगार : ११४००-११००(८)-२०२००-१३००(८)-३०६००-१५००(११)-४६०००-१५००(६)-५५०००-२००
अंदाजे एकत्रित वेतन रु. २५०००
निवड कार्यपध्दती :
१) ऑनलाईन परीक्षा: –
लिपिक पदाकरिता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यांत येईल. सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या याप्रमाणे ९० गुणांची राहिल. या ऑनलाईन परीक्षेसाठी ९० मिनिटांचा कालावधी राहील. ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयांच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल. गणित, बॅंकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषि व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुध्दीमापन चाचणी इत्यादी.
२) कागदपत्रे पडताळणी व मुलाखत :
ऑनलाईन परिक्षेतील गुणांच्या गुणानुक्रमे उपरोक्त नमूद पद संख्येच्या १:३ प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची आसन क्रमांक निहाय यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर मुलाखतीस पात्र उमेदवारांस मुलाखतीपुर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मुळ प्रमाणपत्रांची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी व मुलाखतीस मुलाखतपत्र ई-मेल द्वारे उपलब्ध करुन दिले जाईल. मुलाखतपत्र डाऊनलोड करण्यास अडचण निर्माण झाल्यास [email protected] या ई-मेल द्वारे व 9225176100 या हेल्पलाईनद्वारे संपर्क साधावा. कागदपत्रे पडताळणी वेळी उमेदवाराने मुळ कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवारच बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीस पात्र होईल.
३) मुलाखत:
कागदपत्रे पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवाराची बँक गठीत समितीकडुन मुलाखत घेण्यात येईल. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहील्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. सदर मुलाखत १० गुणांची असून सदर गुणांचे भारांकन बँक धोरणानुसार असेल. त्यामध्ये १० पैकी ५ गुण सबंधित उमेदवारांच्या खालील शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येतील व उर्वरित ५ गुण मौखिक मुलाखतीसाठी देण्यात येतील.
नोकरी ठिकाण : रायगड
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.rdccbank.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा