भारतीय रेल्वेत 1 लाख 40 हजारांहून अधिक रिक्त पदांची भरती, परीक्षेची तारीख जाहीर
भारतीय रेल्वे खात्यातील रखडलेली भरती प्रक्रिया आता लवकरच होणार आहेत. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या परीक्षेसाठी रेल्वे मंत्रालयाने तयारीही सुरु केली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुनच या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तसेच कोरोनाचा प्रसार होणार नाही, याचीही काळजी घेतली जाणार आहे.
भारतीय रेल्वेत एकूण 1,40,640 विविध पदांसाठी परीक्षा होणार आहेत. या मेगाभरतीसाठी कोरोनापूर्वीच रेल्वे मंत्रालयाने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवलेले होते. परीक्षेसाठी एकूण 2.40 कोटी अर्ज आले असून त्यांची छाननी प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. या सर्व जागा विविध श्रेणीच्या पदांसाठी आहेत. कोरोना महामारीमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती. कोरोनामुळे रेल्वे मंत्रालयाला उमेदवारांची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) लांबणीवर टाकावी लागली होती.
या श्रेणींसाठी होणार परीक्षा :
पहिला टप्पा – 1,663 जागा मंत्रालयीन स्तर (स्टेनो)
दुसरा टप्पा – 35,208 जागा बिगर तांत्रिक गट (NTPC) (गार्ड, लिपिक, क्लर्क)
तिसरा टप्पा – 1,03,769 जागा ट्रॅकमन, पॉईंटमन
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून (RRB) यासंदर्भात माहिती देण्यात आली असून तीन टप्प्यांत ही भरती प्रक्रिया पार पडेल. आजपासून या प्रक्रियेला प्रारंभ होईल. रेल्वे विभागाने 11 डिसेंबरला प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार तब्बल सव्वा लाख पदांसाठी 2.44 लाख उमेदवार इच्छूक आहेत. त्यामुळे रेल्वेतील नोकरी मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
परीक्षा तारखा :
भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरु होईल. 15 ते 18 डिसेंबर या कालावधीत उमेदवारांची लेखी परीक्षा होईल.
त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (NTPC) पदांसाठी 28 डिसेंबर ते मार्च २०२१ या काळात परीक्षा होतील.
तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा या मार्च २०२१ नंतर काळात होतील. या परीक्षेचा कालावधी साधारण एप्रिल २०२१ ते जून २०२१ असा असेल.
आयसोलेटेड आणि मिनिस्टिअरल श्रेणीसाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांना ई-मेल आणि एसएमएसच्या माध्यमातून परीक्षेची वेळ, तारीख आणि ठिकाणाची माहिती देण्यात येईल. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या संकेतस्थळावर परीक्षेच्या चार दिवस आधी ई-कॉल लेटर उपलब्ध होईल. त्यापुढील प्रक्रियेची माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल.
RRB NTPC 2020 Exam Pattern :
Subjects | Number of Questions | Duration |
General Awareness | 40 | |
Mathematics | 30 | |
General Intelligence & Reasoning | 30 | |
Total | 100 Questions of 100 marks | 1 hour 30 min |
RRB NTPC 2020 Selection Process :
१. Junior Clerk cumTypist (Undergraduate) Level -2 – Typing Skill Test
२. Accounts Clerk cum Typist (Undergraduate) Level -2 – Typing Skill Test
३. Junior Time Keeper (Undergraduate) Level -2 – Typing Skill Test
४. Trains Clerk (Undergraduate) Level -2
५. Commercial cumTicket Clerk (Undergraduate) Level -3
६. Traffic Assistant (Graduate) Level -4 – Computer Based Aptitude Test
७. Goods Guard (Graduate) Level -5
८. Senior Commercial cum Ticket Clerk (Graduate) Level -5
९. Senior Clerk cum Typist (Graduate) Level -5 – Typing Skill Test
१०. Junior Account Assistant cum Typist (Graduate) Level -5 – Typing Skill Test
११. Senior Time Keeper (Graduate) Level -5 – Typing Skill Test
१२. Commercial Apprentice (Graduate) Level -6
१३. Station Master (Graduate) level -6 – Computer Based Aptitude Test
RRB NTPC 2020 Admit Cards :
या परीक्षेचे प्रवेशपत्र खालील वेबसाईट वर परीक्षाच्या २ आठवड्याआधी प्रदर्शित केले जातील.
Mumbai झोन – www.rrbmumbai.gov.in