RBI Recruitment 2024 : भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघाली आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २ लाख रुपये पगार मिळणार आहे. डेप्युटी गवर्नर पदासाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. याबाबत अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
या नोकरीसाठी तेच लोक अर्ज करु शकतात ज्यांना संबंधित क्षेत्रात कामाचा २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.
डेप्युटी गवर्नर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन सेक्टरमध्ये कमीत कमी २५ वर्ष काम केलेले असावे. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पब्लिक फायनानशियल इन्स्टिट्यूटमध्ये २५ वर्ष कामाचा अनुभव असावा.संबंधित क्षेत्रात मेरिट आणि ट्रॅक रेकॉर्ड चांगला असावा.
डेप्युटी गवर्नर पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला २,२५,००० रुपये वेतन मिळणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला ३ वर्षांसाठी अपॉइंटमेंट होती.
रिझर्व्ह बँकेतील या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे.या नमुन्यात सर्व माहिती भरायची आहे. त्यानंतर हा अर्ज तुम्हाला श्री संजय कुमार मिश्रा, अंडर सेक्रेटरी (BO.1), डिपार्टमेंट ऑफ फायनानशियल सर्विसेस, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, दुसरा मजला, जीवन दीप बिल्डिंग, पार्लियामेंट स्ट्रीट, नवी दिल्ली- ११०००१ येथे पाठवायचा आहे.(RBI Job)