---Advertisement---

खुशखबर! राज्यातील विविध महापालिकांमधील 22381 पदे भरण्याचा मार्ग मोकळा

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील विविध महापालिकांमधील २२३८१ पदे भरण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला असून नगरविकास विभागाने हा शासन निर्णय जारी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ जानेवारी रोजी घेतलेल्या महापालिका आयुक्त आणि मुख्याधिकारी यांच्या परिषदेत महानगरपालिकांतील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, महापालिकांना आस्थापनेवरील खर्च ३५ टक्क्यांपेक्षा जास्त करता येत नाही. आताच बहुतेक महापालिकांचा आस्थापनेवरील खर्च ३५ टक्क्यांपेक्षा जास्त होतो आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊनही रिक्त पदांवर भरती करता येणे शक्य होत नव्हते.

---Advertisement---

त्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने १४ फेब्रुवारीला नवा शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार सन २०२३ मध्ये करायच्या भरतीसाठी ३५ टक्क्यांची ही अट तात्पुरती शिथिल करण्यात आली आहे. तरीही महापालिकांनी आपल्या उत्पन्नाचे स्रोत वाढवून हा खर्च ३५ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचनाही या आदेशात देण्यात आल्या आहेत. या भरती प्रक्रियेमुळे तरूणांचा फायदा होईल. त्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

२८ मनपात २२३८१ पदे या शासन निर्णयानुसार राज्यातील २८ महानगरपालिकांत एकूण २२३८१ पदे रिक्त आहेत. त्यात सर्वाधिक ८४९० पदे बृहन्मुंबई महापालिकेत असून त्याखालोखाल १५७८ रिक्त पदे पिंपरी-चिंचवड महापालिकेत आहेत. सर्वात कमी ८१ रिक्त पदे परभणी महापालिकेत आहेत. ही सर्व पदे या वर्षात भरण्यात येईल.

रिक्त पदे पुढीलप्रमाणे
औरंगाबाद १२३ सोलापूर ३४० परभणी ५८ मालेगाव ६१४ अहमदनगर १८४ अकोला २४९ अमरावती ४८५ नांदेड वाघाळा २०० जळगाव ४५० धुळे १२६ नाशिक ६७१ पनवेल ४१२

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now