आयकर विभागात नोकरी करण्याची ही संधी आहे. विशेष बाब म्हणजे थेट 10 ते 12 हजार पदे ही या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही पुढील काही दिवसांमध्ये प्रसिद्ध केली जाऊ शकते.
नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची माहिती ही केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी दिली आहे. रोकड जप्तीचे प्रमाण वाढले असल्याने ही मोठी भरती राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात येणार आहे. ही मोठी संधीच नक्कीच म्हणावी लागणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची पद्धत ही आॅनलाईनच असणार. विशेष बाब म्हणजे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. लवकरच या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही तुम्हाला आयकर विभागाच्या वेब साईटवर मिळेल. आॅनलाईन पद्धतीनेच तुम्हाला अर्ज हा करावा लागेल.
आयकर विभागाकडून राबवण्यात येणारी ही भरती प्रक्रिया बंपरच म्हणावी लागेल. कारण या भरती प्रक्रियेतून तब्बल 10 ते 12 हजार पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार असल्याचे देखील रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एकप्रकारे मोठी संधीच आहे.
काही दिवसांपूर्वीच आयकर विभाग मुंबई यांच्यातर्फे देखील एक भरती प्रक्रिया राबवण्यात आली. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाकडून मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया या राबवल्या जात आहेत. मात्र, आता जी भरती राबवली जाणार आहे, ती भरती प्रक्रिया खरोखरच मोठी म्हणाली लागेल.