नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण जलसंपदा विभागातील (Water Resources Department) 14 हजार पदांची लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली. सोलापुरातील नियोजन भवन येथील जलसंपदा आढावा बैठकीत जलसंपदामंत्री श्री. पाटील हे बोलत होते.
जलसंपदा मंत्री पाटील पुढे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यावर मोठे बॅरेजेस निर्माण करण्याचे प्रस्तावित आहेत. पहिल्या टप्प्यात भीमा नदीवर 9 बॅरेजेस निर्माण केले जाणार आहेत. प्रत्येक बॅरेजेसची पाणी साठवण क्षमता ही जवळपास 12 टीएमसी इतकी असणार आहे. त्यामुळे या बॅरेजेसमुळे लाभ क्षेत्रातील शेतजमीन सिंचनाखाली येईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जलसंपदा विभागाकडे असलेला अपुरा कर्मचारी वर्ग तसेच धरणाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यावर बोलताना जलसंपदामंत्री श्री. पाटील म्हणाले, जलसंपदा विभागामार्फत आउटसोर्सिंगद्वारे पुढील एक-दोन महिन्यात 14 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे राज्यात सर्वत्र जलसंपदा विभागाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होईल.
हे देखील वाचा :