RITES मध्ये कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार नोकरी; दरमहा पगार ४६००० मिळेल
RITES म्हणजेच रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिस लिमिटेडमध्ये भरती निघाली आहे. विविध पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ डिसेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.
RITES ने एकूण ६० रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. राइट्समध्ये असिस्टंट हायवे इंजिनियर, असिस्टंट ब्रीज/स्ट्रक्चरल इंजिनियर आणि क्वालिटी कंट्रोल इंजिनियर या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
असिस्टंट हायवे इंजिनियर पदासाठी ३४ जागा रिक्त जागा आहेत. असिस्टंट ब्रीज/स्ट्रक्चरलर इंजिनियर पदासाठी ६ जागा रिक्त आहेत. क्वालिटी कंट्रोल इंजिनियर पदासाठी २० जागा रिक्त आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
राइट्समधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ डिसेंबर २०२४ असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० वर्ष असावी. या नोकरीसाठी उमेदवारांना पगार त्यांच्या पात्रतेनुसार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना २५,५०४ ते ४६,४१७ रुपये पगार मिळणार आहे.
RITES च्या या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू २ डिसेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत होऊ शकतो.