संभाजीनगर महानगरपालिकेत विविध पदांच्या 114 जागांसाठी भरती
Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2023 संभाजीनगर महानगरपालिकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 114
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 26
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी. 02) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
2) कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) – 07
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी शाखेची पदवी. 02) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
3) कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) -10
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवी. 02) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
4) लेखा परीक्षक (गट क) -01
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी. 02) लेखा / लेखा परीक्षण विषयक कामाचा किमान 03 वर्षांचा अनुभव आवश्यक. 03) निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. 04) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
5) लेखापाल – 02
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी. 02) लेखा/लेखा परीक्षक विषयक कामाचा किमान 03 वर्षांचा अनुभव आवश्यक. 03) निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. 04) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
6) विद्युत पर्यवेक्षक – 03
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदविका किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण, शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे तारतंत्री अभ्यासक्रम पूर्ण व तदनंतर एन. सी. टी. व्ही. टी. चे प्रमाणपत्र आवश्यक. 02) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
7) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक (गट-क)-13
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदविका किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण. 02) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
8) स्वच्छता निरीक्षक – 07
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. 02) स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण. 03) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
9) पशुधन पर्यवेक्षक – 02
शैक्षणिक पात्रता : 01) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण. 02) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका उत्तीर्ण. 03) शासकीय/निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी सणालयातील संबंधित विषयातील कामाचा किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक 04) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
10) प्रमुख अग्निशामक – 09
शैक्षणिक पात्रता : 1) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण. 02) राष्ट्रीय / राज्य अग्रिशमन प्रशिक्षण केंद्र / महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा 6 महिने कालावधीचा अग्रिशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम / प्रगत पाठ्यक्रम (Advanced Course) पूर्ण करणे आवश्यक. 03) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अग्रिशामक (Fireman) या पदावर विमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.
11) उद्यान सहाय्यक – 02
शैक्षणिक पात्रता : 1) मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी.एस्सी. (हॉर्टिकल्चर्स) अॅग्रीकल्चर / बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी. 02) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेकडील कृषी उद्यान क्षेत्रातील उद्यान निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. 03) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
12) कनिष्ठ लेखा परीक्षक – 02
शैक्षणिक पात्रता : 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी. 02) मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमयदिचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. 03) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
13) अग्निशामक – 20
शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण.
14) लेखा लिपिक – 10
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी. 02) मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. 03) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 12 सप्टेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय / अनाथ – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 1000/- रुपये [मागास प्रवर्ग / अनाथ / दिव्यांग – 900/- रुपये]
पगार : 19,900/- रुपये ते 1,22,800/- रुपये.
नोकरी ठिकाण : छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.aurangabadmahapalika.org