सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘क्लार्क, शिपाई’ पदाच्या 323 जागांसाठी भरती
Satara DCC Bank Recruitment 2024 : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे
एकूण रिक्त जागा : 323
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ लेखनिक (Junior Clerk) 263
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
2) कनिष्ठ शिपाई (Junior Peon) 60
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व संगणकाचे ज्ञान
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जुलै 2024 रोजी,18 ते 38 वर्षे
परीक्षा फी : परीक्षा शुल्क रु. 500/- + 18 टक्के जीएसटी रु. 90/- अशी एकूण रक्कम रु. 590/-
उमेदवाराने भरलेले परिक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
इतका पगार मिळेल :
कनिष्ठ लेखनिक : 910-35-1085-45-1310-45-1535-45-1760-45-1985
कनिष्ठ शिपाई : 650-30-800-35-975-40-1175-45-1400-50-1650
निवड कार्यपध्दती :- ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे
ऑनलाईन परीक्षा :-
कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या पदांकरीता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यांत येईल. परीक्षेस येताना उमेदवाराने परीक्षा शुल्क पावती व शासनमान्य ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या ९० प्रश्नांच्या प्रत्येकी १ गुण याप्रमाणे ९० गुणांची राहील. या ऑनलाईन परीक्षेसाठी ९० मिनिटांचा कालावधी राहील. ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयांच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल. गणित, बैंकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषि व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, इंग्रजी, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुध्दीमापन चाचणी. तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी असेल.
नोकरी ठिकाण: सातारा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2024 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.sataradccb.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा