⁠  ⁠

SBI मध्ये लिपिक पदाच्या 8283 जागांसाठी मेगाभरती ; पात्रता फक्त पदवी

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

SBI Clerk Bharti 2023 पदवी पास तरुणांसाठी बँकेत नोकरीची उत्तम संधी चालून आलीय. भारतीय स्टेट बँकेत तब्बल 8283 जागांसाठी मेगाभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.

एकूण जागा : 8283
यामध्ये 3515 सामान्यांसाठी, 1284 अनुसूचित जातींसाठी, 748 अनुसूचित जमातीसाठी, 1919 OBC साठी आणि 817 EWS साठी राखीव आहेत.

रिक्त पदाचे नाव: ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2023 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पगार – रु.17900-1000/3-20900-1230/3-24590-1490/4-30550-1730/7-42600-3270/1-45930-1990/1-47920.
सुरुवातीचे मूळ वेतन रु.19900/- आहे (रु.17900/- तसेच पदवीधरांना दोन आगाऊ वाढीव स्वीकार्य)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 डिसेंबर 2023  10 डिसेंबर 2023
परीक्षा:
पूर्व परीक्षा: जानेवारी 2024
मुख्य परीक्षा: फेब्रुवारी 2024
उमेदवारांना प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण करावी लागतात. पूर्वपरीक्षा 100 गुणांची असेल. तर मुख्य परीक्षेत 200 गुणांचे 190 प्रश्न असतील. 100 गुणांची वस्तुनिष्ठ चाचणी ऑनलाइन घेतली जाईल. ही चाचणी 1 तास कालावधीची असेल ज्यामध्ये 3 विभाग असतील – इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता आणि तर्क क्षमता. प्रिलिम उत्तीर्ण झालेल्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. मेन्समध्ये यशस्वी झालेल्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर होईल.

अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा


Share This Article