बँकेत नोकरी करून करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1022 पदांसाठी भरती होणार आहे. या संदर्भात, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 1 एप्रिल रोजी जाहिरात जारी केली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज करण्यासाठी sbi.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. पात्र उमेदवार 30 एप्रिल 2023 पर्यंत नोंदणी करू शकतात.
रिक्त पदाचे नाव :
चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर आणि सपोर्ट ऑफिसर या पदांसाठी अर्ज करू शकतात. ए
पात्रता :
फक्त SBI किंवा इतर कोणत्याही सरकारी बँकेतील निवृत्त कर्मचारी अर्ज करू शकतात.
मुलाखतीतून नोकरी मिळेल
SBI मधील भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. यासाठी प्रथम प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून निवड केली जाईल. या उमेदवारांना मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल. 100 गुणांच्या मुलाखतीच्या आधारे अंतिम निवड यादी तयार केली जाईल.
पगार : 36000-41000/-