Susscess Story : खरंतर कष्टाला यश हे मिळतेच. त्यामुळे कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. मग यशाच्या शिखरावर चढता येते.बीड जिल्ह्यातील हटकरवाडी नावाच्या अत्यंत छोट्याशा गावातला दिनकर बेलदर. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण तर घेतले पण पोलिस दलात गगनभरारी पण घजतली.आई-वडील ऊस तोडणी कामगार असल्याने तो देखील त्यांच्या कामात मदत करायचा. कधी हॉटेलात वेटर, हंगामात ऊसतोडणी कामगार, कारखान्यात मळी भरणारा कामगार आणि दवाखान्यात मदतनीस म्हणून काम करून आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी हातभार लावायचा.
दगडू धनाजी बेलदर आणि सीताबाई दगडू बेलदर ह्याचा हा होतकरू लेक. तसे दिनकरला दोन भाऊ आणि बहीण आहे. हे सगळेजण ऊसतोड मजूर आणि हमाल म्हणून काम करतात. काही वर्षांपूर्वी वडील पाय घसरून पडले. त्यानंतर त्यांनी कामावर जाणे थांबवले. गावाकडे जमीन असली तरी पाणी नाही, त्यामुळे शेती निरुपयोगी होती. आईने पूर्वी ऊसतोडणी मजुराचे काम केल्याने सध्या वयामुळे जमेल तसे शेतातील कामे करत असते.
अशा परिस्थितीवर देखील शिक्षणासाठी दिनकर कधी आश्रमशाळेत तर कधी कासेगावच्या जिल्हा परिषद शाळेत शिकत राहिला. पदवीचे शिक्षणासाठी त्याने बीड जिल्ह्यात प्रवेश घेतला. त्यानंतर त्याला वर्दीचे स्वप्न खुणावत होते. सुरूवातीला त्याने इंडियन आर्मीमध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न केला. तीन वेळा परीक्षा दिल्या. वयाची मर्यादा संपल्याने त्याने आर्मीचा नाद सोडून दिला. पोलिस बनण्यासाठी प्रयत्न करत राहिला. या संपूर्ण काळात गावातले लोक णवायचे.नुसताच अभ्यास करतोयस असे सांगतोयस, मग पास का होत नाहीस?’ असे गावाकडचे लोक नावं ठेवू लागले होते. तेव्हापासून गेली ३ वर्षे गावाकडे जाणे बंद केले. घरच्यांची आठवण यायची पण याच जाणिवेतून तो दिवसभर अभ्यास करायचा. सलग आठ वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करत राहिला. पण बाहेरची काम करून भरतीचा अभ्यास करताना अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते.मोठ्या गाड्या धुणे, पुसणे, घरात लागणारा किराणा, भाजीपाला आणून देणे अशी कामे करत होता. त्यानंतर एका दुध संघात त्यांनी दुधाचे कॅन उतरवणे, ओतणे, धुणे अशी कामेही केली. वाटेगाव मधील कारखान्यात ट्रॅक्टरमध्ये मळी भरण्याचेही काम त्याने केले.
परिस्थिती बदलायची तर सातत्याने अभ्यास केला पाहिजे नाहीतर पुन्हा आयुष्यभर आपल्यालाही ऊसतोडणी आणि हमालीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वाटेल तो त्रास सोसून त्याने जवळपास आठ वर्षे पोलीस भरतीचा अभ्यास केला. २०२२-२३ या दोन वर्षात दिनकरने भरतीवर पूर्ण लक्ष एकाग्र केले. याच त्यांच्या पाचव्या प्रयत्नात त्याने राज्य राखीव पोलीस दलात भरती होण्यात यश मिळवले आहे. अहमदनगर कुसळगाव गट क्रमांक १९ मध्ये त्याला हे यश मिळाले.