जगभरातून नासाने अभियांत्रिकी डिझायनर चॅलेंज या स्पर्धेत ६१ संघांची निवड केली. यात सहा भारतीय विद्यार्थांचा समावेश आहे. ही संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे. बासुदेबा भोई, साई अक्षरा वेमुरी, सिद्धांत घोष, आकांक्षा दास, आकर्ष चिटिनेनी आणि ओम पाधी हे मानवी शक्तीवर चालणारे रोव्हर तयार करण्यासाठी अमेरिकेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. जाणून घेऊयात त्यांच्या या यशाची जीवनकहाणी….
बालसुधारगृहात राहून देखील नासा संशोधन कामात सहभाग
आकांक्षा दास केवळ पाच वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. त्याच्या आकस्मिक निधनानंतर आकांक्षाच्या आईला आपल्या मुलीचे संगोपन करणे कठीण होते. आर्थिक अडचणींमुळे आकांक्षा दासच्या आईने तिला ओडिशातील भुवनेश्वर येथील अद्रुता बालगृहात पाठवले. तेव्हापासून ती बालसुधारगृहात राहत होती. बालगृहातील यंग टिंकर अकादमीबद्दल सहभागी झाली. आज, ती नासासाठी निवडलेल्या यंग टिंकर एज्युकेशनल फाउंडेशन टीमसाठी संप्रेषण लीड करत आहे. ती तिच्या टीमची आउटरीच आणि मार्केटिंग व्यवस्थापित करते. इतकेच नाहीतर त्यांनी हँड-ऑन वर्कशॉप्सच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना घडवते. तर तिला भविष्यात महिलांचा स्टेम क्षेत्रात जास्तीत जास्त सहभाग वाढवायचा आहे.
मजुराचा मुलगा बासुदेबाची नासासाठी निवड
कटक जिल्ह्यातील बराल गावातील बासुदेबा भोई हा रहिवासी. चौदा वर्षीय बासुदेबा हा भातशेतीत काम करणाऱ्या रोजंदारी मजुराचा मुलगा आहे.साधारण, तो २०१५मध्ये यंग टिंकर्स एज्युकेशनल फाऊंडेशनमध्ये सामील झाला. त्यापूर्वी तो वडिलांसोबत शेतात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे… आतापर्यंत त्याने विविध सुविधांचा वापर करून अपंग लोकांसाठी बायोनिक हात तयार केले आहेत. इस्रोमध्ये वैज्ञानिक बनून भारताला अभिमान वाटावा, असे बासुदेबाचे ध्येय आहे.
आर्थिक परिस्थितीवर मात करत ओमची सकारात्मक वाट
अत्यंत गरीब आर्थिक परिस्थितीमध्ये एकट्या आईला एकटीने ओमला लहानाचे मोठे केले. त्याला शिक्षण देत चांगल्या पद्धतीने वाढवण्याची धडपड होती. पुढील शिक्षणासाठी त्याला अद्रुताच्या बालगृहात प्रवेश मिळाला. मॅट्रिकनंतर ओम हायस्कूलच्या सायन्स प्रोग्राममध्ये सामील झाला.
ओम पाधी हा केवळ दोन वर्षांचा असताना कौटुंबिक वादानंतर त्यांच्या आईने पतीचे घर सोडले. ओमच्या वडिलांना ओमची काळजी घेण्यात रस नव्हता, त्यामुळे आईला त्याची काळजी घ्यावी लागली. पण लहानपणापासून ओम हुशार असल्याने त्याने अभ्यासात गती मिळवली आणि नासापर्यंत मजल मारली.
आकर्ष चिट्टिनेनीचे संशोधक होण्याचे होणार स्वप्न पूर्ण
आकर्षसाठी नासाचा भाग बनणे हे एक स्वप्न पूर्ण होते. ते आता पूर्ण झाले आहे. तो डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित अनेक नवीन गोष्टी शिकला आहे.
मूळात दहावीचा विद्यार्थी आकर्ष चिट्टिनेनीचे पालक विजयवाडा, आंध्र प्रदेश येथील व्हाईट कॉलर व्यावसायिक आहेत. आता व्यवसायिकाचा मुलगा हा भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या यंग टिंकर संघाचा टेक लीडर आहे.
साई अक्षरा वेमुरीची निराळी झेप !
आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील बारावीची विद्यार्थिनी साई अक्षरा वेमुरी सुरक्षा अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. रोव्हर उत्पादन प्रक्रियेमध्ये ड्रिलिंग, कटिंग, ग्राइंडिंग आणि वेल्डिंग यांचा समावेश होतो. एक सुरक्षा अधिकारी म्हणून, त्याचे काम मजबूत, व्यावहारिक आसन व्यवस्था, सेफ्टी बेल्ट सिस्टम आणि पुरेशी ब्रेकिंग सिस्टमची काळजी घेणे आहे.विजयवाडा येथील प्रीमियर शैक्षणिक संस्था चालवणाऱ्या जोडप्याची मुलगी, साई अक्षरा ही राष्ट्रीय स्तरावरील तिरंदाजही आहे. पण सध्या त्याचं लक्ष रोव्हर चॅलेंजवर आहे.
यंग टिंकर एज्युकेशनल फाउंडेशनचे हे एकूण सहा विद्यार्थ्यांचा हा संघ अमेरिकेत जाऊन भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.