⁠  ⁠

गावातल्या लेकीची कमाल ; निकिताची औषध निर्माण अधिकारी पदी निवड !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Success Story आपल्या आई – वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. तसेच वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निकिताने नोकरी सोडली आणि काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणून स्पर्धा परीक्षेच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. अत्यंत कमी कालावधीत, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत निकिताची औषध निर्माण अधिकारी या पदावर निवड झाली आहे.

निकिता ही मूळची सितानाईक तांडा, ता. कन्नड येथील रहिवासी.‌शिक्षण औरंगाबाद येथे झालेले आहे. शालेय जीवनापासून अत्यंत हुशार, जिज्ञासू, मेहनती, शाळेत विविध स्पर्धेत भाग आणि कॉलेज च्या जीवनात मेडीकल क्षेत्रासारख्या व्यस्त असणाऱ्या क्षेत्रात शिक्षण घेत असतानासुद्धा भाषण, संभाषण सारख्या कलेमध्ये निकीताने विविध स्पर्धेत भाग घेत प्राविण्य मिळविले आहे.

‘मास्टर ऑफ फार्मसी’चे उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर निकिताला चांगल्या पॅकेजची नामांकित फार्मासिटिकल कंपनीमध्ये नोकरी मिळालेली होती. पण वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली.‌ त्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आणि तिच्या मेहनतीला फळ आले. तिची जि. प. उस्मानाबाद येथे औषध निर्माण अधिकारी पदी निवड झाली असून VJ – A प्रवर्गातून प्रथम आली असून सामान्य गटातून तिसरी आली आहे.

Share This Article