आपण आयुष्यभर देशसेवा करायची आणि देशासाठी लढत राहायचे या उद्देशाने शुभमने हा प्रवास सुरू केला. शुभम जगतापने सातारा सैनिकी शाळेत शिक्षण घेतले..त्या काळात त्यांनी बघितलेलं स्वप्न आज सत्यात उतरताना बघून छाती अभिमानाने फुलून आली आहे. शुभम हा मूळचा मनमाडचा लेक.मनमाड येथील रेल्वेतील लोको पायलट मनोज जगताप आणि शिक्षिका वर्षा जगताप यांचा मुलगा शुभम जगताप. यांची भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून नियुक्ती होणे, हे सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
शुभमचे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण मनमाड येथील केंद्रीय विद्यालयात झाले. त्यानंतर सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सातारा येथील सैनिक शाळेमध्ये घेतले. त्यानंतर तो पदवीधर शिक्षणसाठी पुणे येथे गेला. फर्ग्युसन व एचव्ही देसाई महाविद्यालयातून बी.एससीचे शिक्षण भौतिकशास्त्र विषय घेऊन केले. पदवी मिळाल्यानंतर त्याने इन्फोसिसमध्ये एक वर्षे नोकरी केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. शुभमने भारतीय सेनेमध्ये जाण्यासाठी आवश्यक असलेली सीडीएस अर्थात कम्बाइन डिफेन्स सर्विसेस एक्झामिनेशन ही परीक्षा दिली. यासाठी बराचवेळ अभ्यास केला.
डेहराडून इंडियन मिलीटरी ॲकेडमी येथे १८ महिन्याचे प्रशिक्षण झाल्यानतंर त्याची भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली. लेफ्टनंट ऑफीसर या पदासाठी भारतीय सैन्यात दाखल झाला