⁠
Jobs

SIB साउथ इंडियन बँकेत मोठी पदभरती : पगार 63,840 पर्यंत

साउथ इंडियन बँक लिमिटेड (SIB) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार दक्षिण भारतीय बँकेच्या अधिकृत वेबसाइट, southindianbank.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 5 जानेवारीपासून सुरू झाली आहे. अनुभवी आणि नवोदित उमेदवारांना यापदांसाठी अर्ज करण्याची मुभा आहे. पदांचे स्वरूप ते वेतन याविषयी सविस्तर माहिती बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पदाचे नाव :

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) PO नवोदित
शैक्षणिक पात्रता :
इयत्ता 10 वी, 12 वी आणि किमान 60% गुणांसह अभियांत्रिकीची पदवी किंवा इयत्ता 10 वी, 12 वी तसेच पदवी आणि किमान 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी

२) PO अनुभवी
शैक्षणिक पात्रता :
इयत्ता 10 वी, 12 वी किमान 60% गुणांसह उत्तीर्ण कला/वाणिज्य/विज्ञान/अभियांत्रिकी शाखेतील पदवी उत्तीर्ण, कोणत्याही शेड्यूल्ड बँकेतील किमान 2 वर्षांचा स्केल 1/ऑफिसर केडरच्या कामाचा अनुभव

३) क्लार्क नवोदित
शैक्षणिक पात्रता :
इयत्ता 10 वी, 12 वी किमान 60% गुणांसह उत्तीर्ण कला/वाणिज्य/विज्ञान/अभियांत्रिकी शाखेतील पदवी

) क्लार्क अनुभवी
शैक्षणिक पात्रता :
इयत्ता 10 वी, 12 वी किमान 60% गुणांसह उत्तीर्ण कला/वाणिज्य/विज्ञान/अभियांत्रिकी शाखेतील पदवी उत्तीर्ण, कोणत्याही शेड्यूल्ड बँकेतील किमान 2 वर्षांचा क्लार्क केडरचा अनुभव.

वयोमर्यादा :
साऊथ इंडियन बँकेसाठी पदनिहाय वयोमर्यादा विभिन्न आहे. बँकेच्या संकेतस्थळावर याविषयीची माहिती देण्यात आली आहे.

PO नवोदित आणि क्लर्क नवोदित : 26 वर्षे
PO अनुभवी आणि क्लर्क अनुभवी : 28 वर्षे

परीक्षेचे स्वरूप

ऑनलाइन चाचणीच्या गुणांच्या आधारावर उमेदवारांची निवड करण्यात येईल.फेब्रुवारी 2022मध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. परीक्षेतील पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविले जाईल.

परीक्षा फी : सर्वसाधारण प्रवर्गतील उमेदवारांसाठी 800 रुपये अर्जाचे शुल्क आहे. अन्य प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपयांचे शुल्क अदा करावे लागेल.

पगार :

लिपिक : IBA रु. वेतनश्रेणी मंजूर. १७९०० – १०००/३ – २०९०० – १२३०/३ – २४५९० – १४९०/४ – ३०५५० – १७३०/७ – ४२६६० – ३२७०/१ – ४५९३० – १९९०/१ – ४७९२०
PO : IBA ने मंजूर वेतनश्रेणी रु. 36,000 – 1,490/7 – 46,430 – 1,740/2 – 49,910 – 1,990/7 – 63,840
Lateral PO : IBA मंजूर वेतनश्रेणी रु. 36,000 – 1,490/7 – 46,430 – 1,740/2 – 49,910 – 1,990/7 – 63,840

महत्त्वाच्या तारखा :

अर्ज प्रक्रियेस सुरुवात – 5 जानेवारी 2022
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख – 11 जानेवारी 2022

अधिकृत संकेतस्थळ : https://www.southindianbank.com/

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button