कर्मचारी निवड आयोग (SSC) च्या कॉन्स्टेबल GD भर्ती 2022 अंतर्गत सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये बंपर भरती निघाली आहे. SSC कॉन्स्टेबल GD भर्तीच्या अधिसूचनेनुसार, BSF मध्ये 10 हजार 497 जागा रिक्त आहेत. यासाठी पात्र उमेदवार https://ssc.nic.in/ वर जाणून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.
एकूण जागा : १०४९७
रिक्त पदांचा तपशील
अनुसूचित जाती पुरुष – 1405
ST पुरुष – 917
ओबीसी पुरुष – 1980
EWS पुरुष-887
अनारक्षित पुरुष-3733
अनुसूचित जाती महिला – 245
ST महिला – 163
ओबीसी- 348
EWS महिला – 158
अनारक्षित महिला – 661
शैक्षणिक पात्रता :
कॉन्स्टेबल जीडी भरतीसाठी, उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा :
उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल २३ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत मिळेल. या भरतीमध्ये सर्व उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट मिळेल.
शारीरिक निकष
कॉन्स्टेबल भरती प्रक्रियेत संगणक-आधारित परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीईटी) आणि शारीरिक मानक स्थिती (पीएसटी) असेल. CAPF ने ठरविल्यानुसार हे विविध केंद्रांवर आयोजित केले जाईल. माजी सैनिकांना पीईटी/पीएसटीमधून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. त्यांना फक्त लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण करावी लागते.
शारीरिक मानक चाचणी (PST)
उंची (पुरुष)- 170 सेमी
उंची (महिला) – 157 सेमी
छाती (पुरुष) – विस्ताराशिवाय 80 सेमी, कमीतकमी 5 सेमी फुगलेली असावी
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : https://ssc.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा