⁠
Jobs

SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात 2268 जागांसाठी भरती, 12वी उत्तीर्णांना संधी..

SSC Delhi Police Recruitment 2022: SSC दिल्ली पोलीस (स्टाफ सिलेक्शन कमिशन – दिल्ली पोलीस परीक्षा 2022) भरतीचे अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवार ssc.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करू शकतो. एकूण 2268 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 2268

पदाचे नाव:

हेड कॉन्स्टेबल (असिस्टंट वायरलेस ऑपरेटर (AWO) /टेलि प्रिंटर ऑपरेटर (TPO) 857
शैक्षणिक पात्रता : विज्ञान आणि गणित विषय म्हणून मान्यताप्राप्त मंडळातून 12वी (HSC) उत्तीर्ण. किंवा मेकॅनिक-कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टमच्या व्यापारात राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (NTC).

कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) 1411
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण + अवजड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

वयोमर्यादा:
हेड कॉन्स्टेबल (AWO/TPO)– किमान 18 कमाल 27 वर्षे
कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)-पुरुष– किमान २१ कमाल ३० वर्षे

वेतन श्रेणी:
हेड कॉन्स्टेबल (AWO/TPO): Level 4
कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)-पुरुष: Level 3

अर्ज पद्धती : ऑनलाइन

फी: रु. 100 (SC/ST/ESM/स्त्रियांसाठी- कोणतेही शुल्क नाही.)

निवड पद्धत: विविध परीक्षा आणि शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्या (कृपया सूचना वाचा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29th July 2022

अधिकृत संकेतस्थळ : ssc.nic.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : 
हेड कॉन्स्टेबल सूचना लिंक: येथे क्लीक करा
कॉन्स्टेबल ड्रायव्हर सूचना लिंक: येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button