⁠  ⁠

MPSC कडून राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. 6 जुलैला राज्यसेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. दरम्यान, या परीक्षेसाठी घोषित करण्यात आलेल्या जागांमध्येही वाढ करण्यात आली आहे. MPSC तर्फे यापूर्वी 274 पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार होती. त्यामध्ये आता 250 जागांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यसेवेची परीक्षा 524 पदांसाठी घेण्यात येणार आहे. उमेदवारांना 9 ते 24 मे या कालावधीत अर्ज करता येणार आहे.तसेच ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी 24 मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

भरल्या जाणाऱ्या पदांचा तपशील असा आहे –
सुधारित जाहीरातीनूसार उपजिल्हाधिकारी पदासाठी एकूण 7 पदे, सहाय्यक राज्य कर आयुक्त पदासाठी एकूण 116 पदे, गटविकास अधिकारी पदासाठी 52 पदे, सहाय्यक संचालक वित्त व लेखा सेवा 43 पदे, सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी आदिवासी 3 पदे, उद्योग उपसंचालक 7 पदे, सहाय्यक कामगार आयुक्त 2 पदे, सहाय्यक कौशल्या विकास रोजगार उद्योजकता 1 पद, मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी 19 पदे, सहाय्यक गटविकास अधिकारी 25 पदे, सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, 1 पद, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क 5 पदे, कौशल्या विकास (MPSC Update) रोजगार उद्योजकता अधिकारी 7 पदे, सरकारी कामगार अधिकारी, 4 पदे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी साख्यिकी अधिकारी/प्रशासकीय अधिकारी/संशोधन अधिकारी/गृहप्रमुख 4 पदे,उद्योग अधिकारी 7 पदे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी 52 पदे, निरीक्षण अधिकारी 76 पदे,महसूल व वन विभाग 48 पदे, वनक्षेत्रपाल 16 पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा एकूण 45 पदे त्यामध्ये उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य 23 पदे, जलसंधारण अधिकारी 22 पदे, या जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. या भरतीसंदर्भात सुधारित जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Share This Article