⁠  ⁠

Success Story : मेहनतीच्या जोरावर बीडच्या तरुणाचे घवघवीत यश, राज्यात पहिला क्रमांक पटकाविला

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून MPSC परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. यात अनेकांना अपयश पदरी पडतं तर काहींना यश मिळतं. मात्र, जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणीही आपल्याला आपल्या ध्येयापासून रोखू शकत नाही. असच काही बीडमधील एका तरुणाने देखील मेहनतीच्या जोरावर प्रामाणिक कष्ट केले आणि घवघवीत यश संपादन केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या 2020 च्या मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यात बीडच्या शुभम प्रताप पाचंग्रीकर (Shubham Pratap Panchangrikar) याला घवघवीत यश मिळालं आहे. शुभमने राज्यात कर निरीक्षक म्हणून पहिला क्रमांक पटकवला आहे.

बीडच्या शुभम प्रताप पाचंग्रीकर याने 2020 मध्ये STI ची परीक्षा दिली होती. त्याच्या मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत शुभमला 306 मार्क मिळाले आहेत. या गुणांसह शुभमने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

शुभमने कोणत्याही परिस्थितीत आपण अधिकारी व्हायचेच अशी जिद्द मनाशी केली होती. त्याने 2018 पासून एमपीएसी परीक्षा देण्यास सुरुवात केली. त्यासाठी दिवसरात्र अभ्यासही केला. जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणीही आपल्याला आपल्या ध्येयापासून रोखू शकत नाही, असे म्हणत त्याने आपला अभ्यास पुढे चालू ठेवला. आणि विक्रीकर निरीक्षक या पदासाठीची परीक्षा दिली. शुभमचे वडील प्रतापराव हे शासकीय निवृत्त कर्मचारी आहेत. वडीलांची शुभमने शासकीय नोकरदार व्हावे,अशी इच्छा होती. यासाठी त्यांनी वेळोवेळी शुभमला मार्गदर्शन केले.

शिक्षणात पहिल्यापासून हुशार
शुभमचे दहावीपर्यंतचे शिक्षण हे बीड येथील चंपावती माध्यमिक विद्यालय झाले. दहावीत शुभमने 94 टक्के गुण मिळवले. सुरुवातीपासूनच शिक्षणात हुशार असलेल्या शुभमने शिक्षणाचा एक एक टप्पा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केला. शुभमने आपले पुढील उच्च शिक्षण पूर्ण करता यावे म्हणून पुणे जाणे पसंद केले. या ठिकाणी जाऊन त्याने इलेक्ट्रॉनिक अँड टेली कम्युनिकेशन इंजिनियरिंग मध्ये शिक्षण घेतळे. या शिक्षणावर त्याने एका नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पगाराची एक वर्ष नोकरी देखील केली.

Share This Article