⁠
Inspirational

परिस्थितीने घडवलं, पुस्तकांनी विचार दिला आणि आपल्याला खरा शासकीय अधिकारी मिळाला..

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील बाहेरपूरा येथे राहणाऱ्या,जीवनाचे अभ्यासू गुपीत जाणून घेऊन स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्या वाल्मिक महाजन यांची ही कहाणी.

अंधारमय जीवनात शोधली प्रकाशाची वाट!

वाल्मिक महाजन यांच्या परिवाराची परिस्थिती एकदम हलाखीची होती.त्यांच्या आईवडीलांचे जीवन एकदम अंधकारमय होते. आईवडील अशिक्षित व मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा गाडा हाकत संपूर्ण जीवन गेले. वाल्मिक महाजन यांना एक मोठा भाऊ व चार बहिणी असा परिवार आहे. शिक्षण घेत असतांना आपले मोठे भाऊ विठ्ठल एकनाथ महाजन यांच्या चहाच्या स्टॉलवर काम केले.या सगळ्याची कदर वाल्मिक महाजन यांनी ठेवली आणि शिक्षणातून प्रकाशाची वाट धरली.

पुस्तकाने जगणं शिकवलं…

एक पुस्तक किती तरी विचार मांडण्यासाठी प्रवृत्त करतं.तसेच एक अनोखी दिशा येतं हे वाल्मिक यांच्या बाबतीतही झाले.त्यांच्या भावंडांनी त्यांना महात्मा फुले यांचे गुलामगिरी नावाचे एक पुस्तक भेट दिले.तिथपासून त्यांची वैचारिक जडणघडण सुरू झाली.या पुस्तकाने तर घडवलं पण आजूबाजूच्या लोकांनी आणि घरच्या मंडळींनी त्यांना खूप साथ दिली.तू खूप काही करू शकतोस ही आशा देखील दाखवली.

घवघवीत यश मिळवत त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड!

वाल्मिक महाजन प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी शाळेतून झाले‌. १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे बी. एस्सी.कृषी क्षेत्र यात पदवी घेतली. तद्नंतर मुंबई पोलीस दलात १० फेब्रुवारी २००९ रोजी कॉन्स्टेबल पदाची जबाबदारी स्विकारूली. अंधेरी पोलीस ठाणे (मुंबई) येथे ५ वर्ष कर्तव्य बजावत असतानाच परिवराला संभाळून अभ्यास केला. अभ्यास करत असतांना खूप संकट आली. ते आपले पोलिस दलातील कर्तव्य बजावत सदैव स्पर्धा परीक्षा देतच राहीले. अखेर दि. १० फेब्रुवारी २०२१ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत ४०० पैकी ३५१ गुण मिळवून घवघवीत यश मिळवत त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली. वाल्मिक महाजन या तरूणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत ४० व्या रँकमध्ये उत्तीर्ण होवून पीएसआय पदावर आपले नाव निश्चित केले.

मित्रांनो,
कोणतीही परिस्थिती असली तरी आयुष्याच्या परीक्षेत कठोर सामना करून जगावं लागतं.त्यामुळे मनाची तयारी ठेवणं आवश्यक आहे.

Related Articles

Back to top button