⁠
Inspirational

बांधकाम मजूराच्या मुलाची कमाल; उच्च शिक्षण घेऊन मिळवली थेट जपानमध्ये मोठ्या पगाराची नोकरी !

घरातील अठरा विश्वदारिद्य्र, मुलांचा सांभाळ करताना आई- वडिलांची होणारी ओढताण, वडील बांधकाम मजूर असे असले तरी जालना जिल्ह्यातील परतूर शहरातल्या इंदिरा नगर भागात राहणाऱ्या अंबादास बंडू म्हस्के या मुलाने जपानच्या नामांकित होंडा कंपनीत त्याला मोठ्या पगाराची नोकरी देखील मिळाली आहे.

आई-वडील बांधकाम मजूर असल्याने जिथे बांधकाम साईट असेल तेथून जवळ असणाऱ्या सरकारी शाळेत अंबादासचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले.सुरुवातीच्या काळात मुलांची शिक्षणासाठी होणारी फडफड लक्षात घेऊन त्यांच्या आई वडिलांनी अंबादाससह त्याच्या भावंडांना सातवी नंतरच्या शिक्षणासाठी परतूर शहरातील इंदिरा नगर भागात राहणाऱ्या त्यांच्या आजीकडे ठेवले.पुढे बारावी नंतर बी.टेकची पदवी त्याने पुण्यातील कॉलेज ऑफ इंजनिअरिंग, पुणे येथून मिळविली आहे. बी. टेक नंतर गेटमध्ये चांगले गुण मिळवत त्यांची निवड एम.टेक साठी आयआयटी मुंबई येथे झाली. इतकेच नाहीतर एम.टेक ‘तंत्रज्ञान आणि विकास’ या विषयात त्याने सरस कामगिरी करत हे पदक मिळविले आहे.

इंदिरानगर झोपडपट्टी भागात तो राहत असून देखील अभ्यासात हुशार होता. त्याने स्वतःला या क्षेत्रात झोकून दिले.त्यांनी देखील घरच्या परिस्थितीची कायम जाण ठेवली. नवी संशोधन, उच्च शिक्षणाला प्राधान्य दिले. एकवेळ अशी होती की घरात लाईट देखील नव्हती.

तेव्हा शेजारी व रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास केला. आई – वडील दोघेही पोट भरण्यासाठी बांधकाम मजूरी करतात, आजी पण कष्ट घ्यायची ही परिस्थिती बदलण्यासाठी जिद्दीने त्याने अभ्यास करून मुलाखत दिली. यात विशेष म्हणजे पदवी मिळण्यापूर्वीच जपानच्या नामांकित होंडा कंपनीत त्याला मोठ्या पगाराची नोकरी देखील मिळाली आहे.

Related Articles

Back to top button