घरची परिस्थिती गरिबीची…. संपूर्ण कुटुंब हे मोलमजूरी करून घर चालवत…आई- वडील दोघेही निरक्षर पण मध्यमवर्गीय कामगार कुटुंबातील अविनाश विजय खैरनार याने मोठ्या जिद्दीने लष्करी भरतीसाठीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाला. परीक्षा उत्तीर्ण झाल्याने तो लष्कर भरतीसाठी पात्र झाला आहे.
मेहनत केल्याशिवाय काही होणार नाही यासाठी तो दररोज पहाटे धावायला जात असे परिस्थिती बेताची असल्याने दिवसा लागेल त्याठिकाणी काम करायचा कधी शेतीशी निगडित कामे, बांधकाम, वीटकाम हे करून देखील त्याने शिक्षण चालू ठेवले.अविनाशचे प्राथमिक शिक्षण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. केबीएच विद्यालय व ज्युनिअर कॉलेज वडेल येथूनच त्याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो मालेगाव मध्ये गेला.
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने लष्कराची आवड असल्याने एनसीसीत प्रवेश घेतला. एनसीसी करत असताना त्याने पहिल्याच भरतीत मैदान जिंकले आणि वैद्यकीय चाचणीतही यशस्वी झाला. पण काम करून अभ्यास करत असल्याने त्याला परीक्षेत गुण तसे कमी मिळाले.भरतीतील गुणवत्ता यादीत (मेरिट लिस्ट) त्याला स्थान मिळाले नाही. यानंतर त्याने पुन्हा जोमाने अभ्यासाला आणि मैदान सरावाला सुरुवात केली. या संपूर्ण प्रवासात त्याला मोठ्या भावाची बरीच मदत मिळाली.अल्पशा मजुरीवर पोट भरणारे कुटुंबातील लेक देशसेवेसाठी जात आहे. हे देशसेवेत दाखल झाल्याचे स्वप्न साकार झाल्याने त्याच्यासह कुटुंबासाठी अभिमानाची गोष्ट आहे.