आपल्याला आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी यशाचा देखील चढता आलेख ठेवायला लागतो. तसेच दिपक सिंह हे बाराबांकी जिल्ह्यातील एक छोटेसे गाव सेमराय येथील रहिवासी. त्यांचे वडील अशोक कुमार सिंह हे शेतकरी आहेत. तर आई गृहिणी आहेत. ते त्या गावातील पहिले अधिकारी आहेत.
आपल्या ध्येयापासून ते भरकटू नये म्हणून त्यांनी आपल्या पलंगाच्या जवळ एक पांढरा बोर्ड ठेवला होता. या बोर्ड त्यांनी मार्कर पेनने SDM लिहिले होते. झोपताना ते बोर्ड पाहायचे आणि त्यांना SDM होण्याचे त्यांचे ध्येय लक्षात राहायचे आणि सकाळी उठल्याबरोबर ते बोर्ड पाहायचे आणि ध्येय गाठण्याच्या दिशेने कामाला लागायचे. त्यामुळे त्याला अभ्यास करायला अधिक प्रेरणा मिळाली.
पदवी नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी केल्यावर त्यांची २०१८ मध्ये उत्तरप्रदेश पोलीस सेवेत भरती झाले होते. त्यांची पहिली पोस्टींग ही हरदोई येथे झाली होती. तेव्हापासून ते याचठिकाणी सेवेत होते. पोलिस भरती झाल्यावर देखील त्यांनी भाड्याच्या खेलीत राहून अभ्यास केला. पोलीस लाइनमधील लायब्ररीमध्ये जाऊन कठोर मेहनतीने अभ्यास करायचे आणि आता त्यांना त्यांचे फळ मिळाले आहे.
नोकरी सोबतच त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. तरी दिवसाला ४-५ तास अभ्यास करायचे. यामुळेच त्यांची कॉन्स्टेबल पदावरुन थेट डेप्युटी कलेक्टर पदावर निवड झाली.