Success Story : घरी अठरा विश्व दारिद्र्य…. आर्थिक परिस्थिती बेताची, घरात सहा जणांचे कुटुंब…त्यात फिरोज हा मोठा मुलगा. त्यामुळे घर चालविण्याची जबाबदारी वडिलोपार्जित चिकन मटण विक्रीचा व्यवसाय इच्छा नसताना करावा लागत होता. तरी देखील फिरोजी खाटीक याने सरकारी नोकरी जाऊन परिस्थिती बदलण्याची जिद्द उराशी धरली.
फिरोज हा मूळचा एरंडोल तालुक्यातील उत्राण या गावचा. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला देखील चिकन व मटण विक्री करावी लागत असे. यात त्याने कसेबसे दहावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले. आता पुढे काय? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. पण आर्थिक परिस्थिती बेताची मेहनत करून असतानाही रायसोनी कॉलेज जळगावला एम. बी.ए. केले. परंतू सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी होते त्यासाठी तो अधिक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागला.व्यवसाय व घर चालवितांना कुठलाही क्लास न लावता अभ्यास चालू होता.
प्रामाणिकपणे व सातत्याने अभ्यास करूनही त्याला अपयश येत होते. मागील दोन तीन वर्षांपासून परीक्षेत अनुत्तीर्ण होत होता. अखेर, तो यशस्वी झाला. त्याच्या कष्टाचे चीज झाले. २०२३ मध्ये तलाठी, आरोग्यसेवक पदाची जाहिरात निघाली.
त्यासाठी त्याने अर्ज केला आणि पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला. गावातील एका वेळेस दोन परीक्षेत पास होणारा गावातील हा पाहिला ठरला. चिकन, मटण विक्री करणाऱ्या युवकाने सरकारी नोकरी लागण्याचे स्वप्न उराशी आणि मेहनतीने पूर्ण केले. हे अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.