⁠  ⁠

अवघ्या २३व्या वर्षी आर्मिश झाली हवाई दलातील (IAF) सर्वात तरुण महिला अधिकारी !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

डॉक्टर आर्मिशचा हा प्रवास जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे उत्तम उदाहरण म्हणजे आर्मिश असिजा हिने अवघ्या २३व्या वर्षी भारतीय हवाई दलातील [IAF] सर्वात तरुण महिला अधिकारी बनून दाखवले आहे. ती मुळची पंजाबच्या, फाजिल्का या सीमारेषेजवळीत भागातील रहिवासी.

आर्मिशचे वडील, महदीप असिजा हे इन्व्हायर्मेंटल इंजिनियर आहेत; तर आई, डॉक्टर सोनिका असिजा, हिसार येथील गुरु जंबेश्वर विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात रसायनशास्त्र विभागाची प्रमुख आह

तिने लहानपणापासून तिच्या घरात भारतीय सैन्याबद्दल प्रचंड आदर असल्याचे पाहिले होते. त्यामुळे ही नोकरी इतर सर्वांपेक्षा वेगळी आहे याची तिला जाणीव झाली‌ होती.‌ म्हणूनच तिने आर्मिशने पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसचे पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. तिथे तिने उत्तम शैक्षणिक कामगिरी करून एकूण १५० विद्यार्थ्यांमध्ये पाचवा क्रमांक प्राप्त केला आणि स्वतःसाठी IAF मधील फ्लाइंग ऑफिसर हे पद प्राप्त केले आहे.

ती आर्मिश केवळ अभ्यासात नव्हे, तर खेळातदेखील उत्तम आहे. लष्करी वातावरणामुळे तिच्या बास्केटबॉल आणि रोलर स्केटिंगमधील सहभागामुळे, बुद्धीसह शारीरिक स्वास्थ्यसुद्धा उत्तम होते. ती या क्षेत्रात भरती होणारी आर्मिश, असिजा कुटुंबातील पहिली व्यक्ती असून, तिने पुढील अनेक पिढ्यांसाठी एक मोठा पाया रचला आहे.

Share This Article