Success Story : आपण फक्त स्वप्न बघून चालत नाही तर ती सत्यात साकार करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. तशीच पुलकित रात्रा याची यशाची कहाणी…त्याच्या स्वप्नपूर्तीच्या प्रवासात अनेक अडथळे आले. तरीही त्याने कधीच हार मानली नाही आणि त्याचा प्रवास पूर्ण करून दाखवला.पुलकितचा जन्म जम्मूमधील एका सामान्य कुटुंबात झाला. पुलकित रात्राचे लहानपणापासूनच हवाई दलात IAF फ्लाइंग ऑफिसर बनण्याचे स्वप्न होते.पण आर्थिक परिस्थिती बेताची होती.पुलकित रात्राने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
वडिलांनी कपडे शिवून कुटुंबाचे पालनपोषण केले आणि त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या पाठीशी उभे राहिले.त्याने देखील खूप अभ्यास केला. बारावीच्या टप्यावर असताना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणिता या विषयात उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला. तसेच, पुढच्या परीक्षा देखील अशाच पध्दतीने पास होत गेला.फ्लाइंग ऑफिसर बनलेल्या पुलकित रात्राची एनसीसी स्पेशल एंट्रीद्वारे एअर फोर्सच्या जानेवारी २०२३ च्या कोर्ससाठी निवड झाली
आणि अखेर भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर बनून, त्याने आपल्या कुटुंबाला त्याच्याबद्दल अभिमान वाटेल असा आनंद अनुभवण्याची संधी मिळवून दिली.आता त्याची हवाई दलात IAF फ्लाइंग ऑफिसरची नियुक्ती होणार आहे. स्वप्ने पाहणाऱ्या अशा अनेक तरुणांसाठी त्याची कहाणी म्हणजे एक आशेचा किरण आहे.