छोट्याशा गावात जडणघडण झाली असली तरी अनिरुद्ध देशमुख याने मोठे यश मिळवले आहे.अनिरूद्ध लहान असताना त्याच्या वडिलांचे अकाली निधन झाले. अनिरुद्धची आई म्हणजेच विद्या देशमुख यांनी मोठ्या हिंमतीने दोन्ही मुलांना घडवले. त्यांनी २००६ साली कडेगाव एमआयडीसी मधील एका कंपनीत अकाऊंट डिपार्टमेंटमध्ये काम केले.
अगदी तुटपुंज्या पगारातील नोकरीवर संसारगाडा सांभाळला. आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी पोटाला चिमटा काढून मुलांना चांगलं शिकवायचं अन् मोठ करायचं.त्या पगारात भागत नसल्यामुळे नंतर त्या एस्.सीआयटी शिकल्या व एका एनजीओ मध्ये कामाला लागल्या. मुलांनी पण या कष्टाची जाणीव ठेवली. अनिरुद्धच्या यशात त्याच्या आईचा संघर्ष हा प्रचंड मोठा आहे.
अनिरुद्ध २०२२ साली इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग चांगल्या गुणांनी पास झाला.लगेचच,त्याला बेंगलोर मध्ये विप्रो या कंपनीत कामाला होता.अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या अनिरुद्ध हा नोकरी सांभाळत या परीक्षेची तयारी करत होता. दोन वर्षाच्या अथक परिश्रमानंतर अनिरुद्धने पहिल्याच प्रयत्नात संपूर्ण देशात ३५ वा येऊन अत्यंत कष्टातून व जिद्दीने अनिरुद्ध देशमुख याने वयाच्या पंचवीशीत आर्मी लेफ्टनंट पद मिळवले.