आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आधीपासूनच धडपड करणे महत्त्वाचे आहे. त्या स्वप्नांच्या वाटेवर जात असताना अनेक अडचणी आल्या तरी स्वप्न अहोरात्र मेहनत करण्यासाठी बळ देतात. असेच अशिताने स्वप्न उराशी बाळगले आणि ते पूर्ण झाले. अशिता सोमवंशीची जडणघडण विद्येचे माहेरघर मानले जाणाऱ्या पुण्यात झाली. तिथेच तिचे शालेय शिक्षण झाले.
अशिताचे वडील राजाभाऊ इंजिनीयर तर आई उज्वला शिक्षकेतर कर्मचारी आहेत. अशिताचे बालपणापासून वैमानिक होण्याचे स्वप्न होते. म्हणून तिने दहावीनंतर खाजगी क्लासला प्रवेश घेतला..भारती विद्यापीठ परिसरातील अशिता सोमवंशी या धनकवडी येथील जेठेज् ॲकॅडमीच्या मदतीने तयारी करायला सुरुवात केली.
यात तिने एएमइ -सीईटी परीक्षा उत्तीर्ण झाली. इतकेच नाहीतर तिने IIT-JEE, SRM-JEE आणि VIT वेल्लोर सारख्या इतर स्पर्धा परीक्षांमध्येही अशिता यशस्वीपणे उत्तीर्ण झाली. मित्रांनो, आपण शिक्षणाच्या वाटेवर ठाम असलो की यशाची दारे आपोआप उघडतात.