हक्काचे घरही नव्हते पण काजल झाली पोलिस !
Success Story : मुलींनी जिद्द, कष्ट केल्यावर खरोखर मुली यशाचे शिखर गाठतात. याचे उदाहरण म्हणजे काजल धनावडे. काजल ही एक गरीब कुटुंबातील मुलगी आहे. तिच्या कुटुंबाला रहायला चांगले घरही नाही. घरची परिस्थिती पाहून तिला घरकुल मंजूर करण्यात आले… तेव्हा तिला घर मिळाले. तिला पण तिची जिद्द मात्र खास होती.
काजलचे वडील मुंबईत हमाली करतात. आणि आई दीपाली रोज मोलमजुरी करते. आईच्या मेहनतीवर त्यांच्या घराची चूल पेटते. काजलचे घर इतके साधे आहे की कधी बाजूची भिंत किंवा छप्पर कधी खाली येईल हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीतही काजलने जिद्द सोडली नाही. परिस्थितीशी दोन हात करत आपल्या जिद्द आणि कष्टाच्या जोरावर तिने हे यश संपादन केले.
तिला लहानपणापासूनच वर्दीचे आकर्षण होते त्यामुळे तिने पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने २०१९ मध्ये जावली करिअर अकॅडमीमध्ये फक्त अन् फक्त खाकी वर्दीसाठी प्रॅक्टिस करू लागली. या मेहनतीला अखेर यश आले. काजल धनावडे ही पोलीस भरती झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे.