निकिताची संपूर्ण जडणघडण ही ग्रामीण भागात झाली. पण तिने मोठ्या हिंमतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. फक्त तयारी केला नाहीतर ते पूर्ण करून दाखवले.
निकिता ही मूळची सितानाईक तांडा, ता. कन्नड येथील रहिवासी आहे.शाळेत विविध स्पर्धेत भाग आणि कॉलेज च्या जीवनात मेडीकल क्षेत्रासारख्या व्यस्त असणाऱ्या क्षेत्रात शिक्षण घेत असतानासुद्धा भाषण, संभाषण सारख्या कलेमध्ये निकीताने विविध स्पर्धेत भाग घेत प्राविण्य मिळविले आहे. निकिताचे वडील औरंगाबाद येथे पोलीस म्हणून नोकरी करतात. तिचे शालेय शिक्षण हे गावातच झाले.
तर, काही शिक्षण हे औरंगाबाद येथे झालेले आहे. मग ‘मास्टर ऑफ फार्मसी ‘चे उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर निकिताला चांगल्या पॅकेजची नामांकित फार्मासिटिकल कंपनीमध्ये नोकरी मिळालेली होती. परंतू वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निकिताने नोकरी सोडली आणि काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणून स्पर्धा परीक्षेच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. यात यश देखील मिळाले. तिची जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे औषध निर्माण अधिकारी पदी निवड झाली आहे.