प्रगतीची आर्थिक परिस्थिती ही बेताची…तिचे वडील हे साऱ्या कुटुंबाचे रिक्षा चालवून उदरवनिर्वाह करतात.तर तिची आई ही गृहिणी आहे.इंदापूर तालुक्यातील निरवांगी मूळ गावची प्रगती शिवाजी काशिद. तिने गावाचे नाव रोशन केले आहे. तिचे शालेय शिक्षण हे गावातच झाले.गावाजळील मानेवस्ती येथील शिवाजी काशिद यांचे कुंटूब उपजिवेकेसाठी पिंपरी चिंचवडीमधील चिखलीजवळील मोरेवस्ती येथे १९९२ साली स्थलांतरित झाले.
त्यानंतर, तिने अकरा – बारावीचे शिक्षण मॉर्डन कॉलेजमध्ये पूर्ण केले. पुढे, विज्ञान शाखेतून पदवी शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान तिने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.या तयारीसाठी काही दिवस खासगी शिकवणी लावण्याची गरज होती. मात्र घरची आर्थिक परस्थिती हलाखीची असल्यामुळे पैसे नव्हते. वडिलांनी कष्टाने तिने ह्यासाठी प्रोत्साहन दिले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होण्याचा पहिला प्रयत्न अगदी दोन गुणांनी हुकला. याच दरम्यान कोरोना काळ आला. त्याचा तिने चांगला वापर करून घेतला. याच काळात तिने जास्तीत जास्त अभ्यास केला. दुसऱ्यांदा परीक्षेची जोमाने तयारी सुरु केली. जिद्द व चिकाटीच्या जोरावर प्रगतीने दुसऱ्या प्रयत्नामध्ये यश मिळविले आहे. ती नियमित दहा ते बारा तास आभ्यास करीत होते. तिने मोबाईलचा मर्यादित गरजेपुरता वापर होता.
सोशल मिडीयाचा वापर केला नाही. यू-ट्युबचा उपयोग आभ्यासासाठी केला. नियमित व सातत्याने अभ्यास केलल्यामुळे स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळले असून विक्री कर निरीक्षक होणार आहे. प्रतिकुल परस्थितीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये दुहेरी यश मिळविले आहे. मंत्रालयातील सहायक कक्ष अधिकारी पदासाठी पण तिची निवड झाली आहे.