⁠  ⁠

अकलूज गावच्या लेकीच्या जिद्दीला सलाम ; प्रणिताने अहोरात्र मेहनत करून मिळवली सरकारी नोकरी !

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

आपली स्वप्ने ठाम असली की आपोआप वाट मिळत जाते. याचे उदाहरण म्हणजे प्रणिता हाले. ही मूळची सोलापूर जिल्ह्यातील अकलूज गावची लेक. तिचे वडील गावच्या जवळच असलेल्या दूध संघात काम करतात. तर आई गृहिणी आहे. तिचे शालेय शिक्षण हे लक्ष्मीबाई प्रशाला यशवंतनगर, अकलूज येथे झाले. तिला पाचवीनंतर खेळाची अधिक आवड निर्माण झाली. त्यात तिने मेहनत करायला सुरुवात केली. शाळेत देखील ती खेळाचा सराव करत असते. पण अभ्यासाची कास काही सोडली नाही.

तिने दहावीपर्यंत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत बाजी मारली. तर गणित विषयात १५० पैकी १४२ गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळवला. आपण यापुढे उच्च शिक्षण घेतले पाहिजे. या ध्यासापायी तिने अकलूज मधील इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घेतला. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असताना तिला स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण झाली. तिला आरटीओ ऑफिसर बनायचे होते.

म्हणून, तिने मॅकेनिकल क्षेत्रात इंजिनिअर करण्याचे ठरविले होते. तिने चांगल्या गुणांनी पदवी पूर्ण केली. यानंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला पुणे गाठले. साधारणपणे २०१९ पासून तिने‌ स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. दिवसभरात फक्त आणि फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. पण हा प्रवास सोपा नव्हता. कोरोनाच्या काळात सारं काही थांबल्याने आता पुढे काय होणार? हा प्रश्न होता.

पण तिने अहोरात्र मेहनत चालू ठेवली. या मेहनतीच्या जोरावर आरटीओ बनण्यासाठीची परीक्षा दिली पण एका गुणांनी पोस्ट हुकली. आता एवढ्यावरच थांबून चालणार नाही, अभ्यास करत राहिला पाहिजे म्हणून तिने इतर अनेक सरकारी नोकरीच्या परीक्षा दिल्या. यात तिला यश मिळाले. अभ्यासाचा पाया मजबूत असल्याने विविध पदांसाठी निवड झाली. पण तिने आय.टी.आय प्रशिक्षक (Instructor) हे पद निवडले. तिचा हा प्रवास ग्रामीण भागातील मुलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

Share This Article