---Advertisement---

17व्या वर्षी लग्न, 20व्या वर्षी नवऱ्याचे निधन; परिस्थितीशी लढून प्रतीक्षा झाल्या बँकेत अधिकारी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

आयुष्यात यशाला शॉर्टकट नाही. त्यासाठी मेहनत सातत्य आणि जिद्द असणे आवश्यक असते. आपली परिस्थिती ही कधीच आपले यश ठरवू शकत नाही. त्यासाठी आपण किती मेहनत केली हे आपले यश ठरवते. अशाच असंख्य अडचणींचा सामना करून व त्यातून मार्ग काढून यशाला गवसणी घातली आहे सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या प्रतीक्षा तोंडवळकर यांनी.

प्रतीक्षा यांना आपले ध्येय गाठण्यासाठी असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले परंतु त्या अडचणींमधून मार्ग काढत यशाच्या शिखरापर्यंत पोहोचले आहेत. प्रतीक्षा यांचे सतराव्या वर्षीच लग्न झाले त्यावेळी त्यांनी दहावीची परीक्षा देखील दिली नव्हती.पती स्टेट बँकेत बुक बाईंडर म्हणून काम करायचे त्यामुळे वया आधीच त्यांचे लग्न लावून देण्यात आले. वयाच्या 17 व्या वर्षी लग्न होऊन त्या वयाच्या विसाव्या वर्षी विधवा झाल्या. त्यांच्या पतीचा दुर्दैवी अपघात झाला व त्यात त्यांचे निधन झाले.

पतीचे इतक्या कमी वयात निधन झाल्याने आता पुढील आयुष्य कसे जगावे हा प्रश्न प्रतीक्षा यांच्यासमोर होता. या बिकट परिस्थितीत देखील त्या खचून न जाता संघर्ष करत कुटुंबाची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला, व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्टेट बँकेत सफाई चे काम करण्याचा निर्णय घेतला. कमी वयात लग्न झालेले असल्याने त्यांचे शिक्षण झालेले नव्हते, म्हणून कुठे चांगल्या ठिकाणी नोकरीही मिळत नव्हते. सफाई चे काम करत असताना त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला व रात्रीच्या कॉलेजमध्ये जाऊन बारावी पास केली व नंतर त्यांनी पदवी प्राप्त केली. माणूस आयुष्यभर शिकत असतो शिक्षणाला मर्यादा नाही हे प्रतीक्षा यांनी सिद्ध करून दाखवले. प्रतिक्षा यांनी मानसशास्त्र विषयात बदली मिळवली होती. काम चांगले असल्याने त्यांना सफाई कामगारापासून बँक क्लर्क पदावर प्रमोशन मिळालं.

कमी वयात विधवा झाल्याने पुढचे पूर्ण आयुष्य त्यांच्यासोबत होते, पुढील आयुष्य जगण्यासाठी कोणीतरी साथीला पाहिजे असं प्रत्येकालाच वाटते, याच कारण प्रतीक्षा यांनी 1993 मध्ये पुन्हा लग्न केले त्यांचे पदी प्रमोद यांची त्यांना खूप साथ मिळाली. तिच्या पाठिंब्यामुळे पतीच्या आग्रहास्तव त्यांनी बँकिंग परीक्षा देण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी अथांग मेहनत सातत्या व जिद्दीने त्यांनी अभ्यास केला. त्यांची प्रशिक्षण प्रशिक्षणाची अधिकारी म्हणून पदोन्नती झाली व त्या सीजीएम आणि एजीएम पदावर पोहोचल्या. बँकेत सफाई कामगार ते त्याच बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर असा हा प्रतीक्षा तोंडवळकर यांचा प्रवास प्रत्येकालाच प्रेरणा देणारा आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts