लहानपणापासूनच आपण भविष्याचे अनेक स्वप्न बघत असतो परंतु ते स्वप्न बघितल्या प्रमाणेच पूर्ण होतील असे नाहीत. जसे वय वाढते कसे विचार बदलतात ध्येय बदलतात व ठरवल्यापेक्षा आपण काहीतरी वेगळे करून दाखवतो. परंतु हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्वलंत इच्छाशक्ती सातत्य आणि ध्येयपूर्तीसाठी केलेली मेहनत हे नक्कीच आपल्याला यशाचे उंच शिखर गाठण्यासाठी मदत करते. आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नसते एखादी दुसरं काम करत असताना देखील आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. असेच एक उदाहरण म्हणजे रोमन सैनी यांचे.
रोमन सेनी यांना अनेकजण ओळखतात ते म्हणजे अनअकॅडमी चे संस्थापक म्हणून परंतु हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी करत या ध्येयापर्यंत पोहोचले आहेत. रोमन सैनी यांनी एमबीए चे शिक्षण पूर्ण केले, व त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. एमबीबीएस पूर्ण करून डॉक्टर पदवी मिळाल्यानंतरही त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला लहानपणापासून अभ्यासात हुशार असल्याने 16 व्या वर्षी AIIMS ची परीक्षा उत्तीर्ण केली. व वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी एमबीबीएस पदवी प्राप्त केली.
21 व्या वर्षी एमबीबीएस पदवी प्राप्त करून त्यांनी वयाच्या 22 व्या वर्षी यूपीएससीची परीक्षा क्रॅक केली व ते आयएस ऑफिसर बनले. हे करून देखील आयुष्यात आपण काहीतरी वेगळं करावं मोठं करावं असा विचार त्यांना नेहमी येत होता. यातूनच मार्ग काढत त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आय एस पदी नियुक्त असताना देखील त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला व त्यांनी गौरव मुंजाल आणि हेमेश सिंग यांच्यासोबत अनअकॅडमी ची स्थापना केली. आज तो भारतातला प्रतिष्ठित आणि सुप्रसिद्ध असा एज्युकेशन प्लॅटफॉर्म बनला आहे. आज रोमन यांच्या अन अकॅडमी कंपनीची किंमत 26000 कोटी रुपये इतकी आहे. व्यवसायातून ते 88 लाख रुपये सॅलरी म्हणून कमवतात असे मीडिया रिपोर्ट्स द्वारे समोर आले आहे.
मनात जर काहीतरी करून दाखवण्यासाठी अथांग मेहनत करण्याची तयारी ज्वलंत इच्छाशक्ती असेल तर आपण आयुष्यात नक्कीच यश प्राप्त करू एम्स मधून एमबीबीएस नंतर यूपीएससी व आयएएस ची नोकरी सोडून रोमन सैनी यांनी आपले स्वप्न पूर्ण करत आज 26 हजार कोटींची कंपनी स्थापन केली आहे. रोमन सैनी यांचा हा जीवन प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.