सरना जिल्ह्यातील एकमा या गावच्या या सात बहिणींनी मोठी कमाल केली आहे. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती ही बेताची होती. गिरणी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. वंशाचा दिवा हवा म्हणून मुलगा होईल या अपेक्षेने ते सात मुलींचे पिता बनले व आठवा मुलगा झाला.
या काळात लोकांचे अनेक टोमणे ऐकले. पण त्यांनी मुलींना घडवलं.वडिलांच्या या अफाट कष्टाचे देखील मुलींनी सार्थक करून दाखवले व सरकारी सेवेत सगळ्या मुली अधिकारी पदावर रुजू झाले आहेत. मुलींनी देखील अनेक समस्यांना तोंड देत नोकरीसाठी प्रयत्न केले व कष्ट घेऊन आज त्या अधिकारी पदांवर आहेत.
सर्वात मोठी बहीण राणी कुमारी सिंह दुसरी बहीण रेणू कुमारी सिंह या बिहार पोलीस दल आणि सशस्त्र सीमा दलामध्ये भरती झाल्या. नंतर या दोन्ही बहिणीकडून प्रोत्साहन आणि प्रेरणा घेऊन बाकीच्या पाच बहिणी सोनीकुमारी या सीआरपीएफमध्ये, प्रीती कुमारी या क्राईम ब्रँचमध्ये, पिंकी कुमारी या एक्साईज पोलीसमध्ये, पिंकी कुमारी या बिहार पोलीस दलात तर नन्ही कुमारी या जीआरपी सारख्या दलामध्ये आज अधिकारी पदावर नियुक्त असून कार्यरत आहेत. याची प्रेरणा घेऊन गावातील मुली देखील पोलीस दलाची तयारी करून पोलीस दलामध्ये भरती होत आहे.