---Advertisement---

शेतकऱ्याची लेक ठरली जहाजावरील महिला डेक ऑफिसर !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Success Story : आपली मुलगी देखील स्वावलंबी आणि आत्मनिर्भर‌ बनू शकते. हा विश्वास पालकांनी दाखवला तर मुली नक्कीच गगनभरारी घेऊ शकतात. शेतकरी कुटुंबातील सिमरन थोरात देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर बनली असून ती देशातील युवतींसाठी आयडॉल बनली आहे. वडील ब्रम्हदेव, आई आशा तसेच भाऊ शुभम यांना देते. त्यांनी सिमरनच्या स्वप्नांस पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान केले. त्यांनी तीन एकर जमीन विकून सिमरनचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली.

सिमरन ही शेतकरी कुटुंबात वाढलेली लेक. इंदापूर तालुक्यातील वडापूरी या छोट्या गावात तिची जडणघडण झाली.तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण इंदापूर येथील श्री नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये झाले. बारावीनंतर तिने प्रवेश परीक्षा देवून पुण्यातील महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (एमएएनटीई) कॉलेजमध्ये सन २०१६ साली प्रवेश घेतला. सिमरन व तिचा भाऊ शुभम हे दोघेही मर्चन्ट नेव्ही मध्ये ऑफिसर आहेत. प्रॉपर्टी चा विचार न करता, वेळ प्रसंगी प्रॉपर्टी विकून आई वडील यांनी घडविले.

सन २०१९ साली तिची कॉलेज मधूनच व्हनकुवर कॅनडा येथील सिस्पन शिप मॅनेजमेंट या कंपनीत निवड झाली. तिने बीएसस्सी नॉटीकल सायन्स ही डिग्री घेतली. या कंपनी मध्ये अनेक देशातील मुली उच्च पदावर होत्या. परंतू भारतातून पहिल्यांदाच सिमरन हिची निवड झाल्याने नवा इतिहास घडला.तिने २०१९ साली पहिले जहाज ट्रेनी (डेक कॅडेट ) म्हणून सुरुवात केली. त्यानंतर तिने पुढची परीक्षा देऊन लायसेन्स मिळवले. त्यानंतर तिची भारतातील पहिली महिला नेव्हीगेटिंग ऑफिसर म्हणून सदर कंपनीत निवड झाली.स्वप्नांना प्रयत्नांची जोड असेल तर ती नक्कीच पूर्ण होतात याचा प्रत्यय वडापुरी (ता. इंदापूर) येथील सिमरन ब्रम्हदेव थोरात हिच्या गरुड भरारीवरून येत आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts