गॅरेजमध्ये काम करत अभ्यास केला; जिद्दीने सुरजने मिळविली भारतीय नेव्हीमध्ये नोकरी

Published On: ऑक्टोबर 26, 2024
Follow Us

आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते. सुरज महादेव मोटे याची आर्थिक परिस्थिती बेताची होती‌. त्यामुळे उपजीविकेसाठी तो गॅरेजमध्ये काम करायचा.पहाटे पाच वाजता उठून तो सकाळी आठपर्यंत अभ्यास करत असत, त्यानंतर दुकानात काम करत आणि दुपारी कॉलेजला जात असत. मागील चार वर्षांपासून त्याने या परीक्षेची तयारी केली आहे

सुरजचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षण कोरवली येथील देशमुख प्रशाला येथे झाले आहे. परीक्षेची तयारी करत असताना सुरज आपले पंचर दुकानही सांभाळत होता. नेव्ही परीक्षेची तयारी करत त्यांनी आपले कुटुंबाचे स्वप्न पूर्ण केले आहे. दोन महिन्यांपूर्वी त्याने नेव्हीची परीक्षा दिली होती, ज्याचा निकाल सोमवारी लागला आणि त्यात त्याने यश मिळवलं आहे.प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय नेव्हीच्या एस.एस.आर पदावर निवड झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025