परिस्थिती हीच आपली जिद्द बनते. ही गोष्ट आहे कामागाराच्या लेकीची…श्वेताची आई २०१३ पासून सफाई कामगार म्हणून काम करत आहे तर श्वेताचे वडिल मजूरी करतात. त्यामुळे पैशाअभावी त्यांनी मुलीला शिक्षणासाठी रोखले नाही. श्वेताने आपले प्राथमिक शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत पूर्ण केले, त्यानंतर तिने साधना इंग्लिश मिडीयम विद्यालय हडपसर येथून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
याच दरम्यान तिने महाविद्यालयीन आयुष्यात एनसीसी प्रवास सुरू केला. यामुळे तिला आपण देखील सैन्य दलात जावे ही जाणीव निर्माण झाली.पुढील पदवीसाठी हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिच्या रोजच्या रुटीनमुळे तिला कॉलेजला वेळ देता येत नव्हता, त्यामुळे तिने कॉलेज बाहेरुन पूर्ण केले. श्वेता रोज पहाटे ४.३० वाजता उठायची.
५ वाजता घर सोडून बसने मैदानाच्या दिशेने निघायची. तिच्या शारिरिक प्रशिक्षणाचे सत्र उरकून ती ९.४५ ला घरी यायची. ही तिची दिनचर्या तिला फिजिक मेडिकल टेस्ट आणि लेखी परिक्षेमध्ये यश मिळवून देण्या महत्त्वाची ठरली.कामे आवरून ती तिच्या लेखी परिक्षेचा अभ्यास करायची.आपल्या प्रतिकुल परिस्थितीला टक्कर देत भारतीय नौदलात स्थान मिळवले आहे. ती सध्या चिल्का, ओडिसा येथे आपले श्वेता पंडित आपले प्रशिक्षण पूर्ण करत आहे.