वेदिका ही टेर्ले शेतकरी कुटुंबात जन्मलेली होतकरू लेक. वेदिका लहानपणापासूनच हुशार आणि नावीन्यपूर्ण गोष्टी करण्याची तिला आवड होती.
घरातील सर्वचजण शेती करतात.वेदिकाचे माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत झाले. पुढे क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदविका, तर गोखले अभियांत्रिकीमधून पदवी मिळविली. क. का. वाघ अभियांत्रिकीमधून पदव्युत्तर पदवी मिळवून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंतापदी नियुक्ती झाली आहे.
१६ डिसेंबर २०२३ ला झालेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सरळसेवा परीक्षेतून सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता ‘गट ब’ या पदावर तिची निवड झाली. अखेर परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम सरळसेवेच्या परीक्षेत यश मिळवून आईवडिलांसह कुटुंबियांची मान उंचावली.मुलगीही अधिकारी होऊ शकते. संधी व पाठिंबा दिला तर मुलगी अधिकारी होऊन दोन्ही घराचे नाव उंचावू शकते,