---Advertisement---

अमळनेरच्या तरूणाने केली कमाल ; असिस्टंट कमांडरपदी निवड !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

आपण कोणत्या परिस्थितीतून आलो आहोत. यापेक्षा परिस्थिती बदलण्यासाठी काय कष्ट घेतले पाहिजे.‌ याची जाणीव ठेवून अभ्यास करणं महत्त्वाचे आहे.यशपाल पवार याने करून दाखवले. त्याला शालेय जीवनापासूनच उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगल्याने कला शाखेकडे कल होता. आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर असल्याने चिकाटीने स्पर्धा परीक्षेला सामोरे गेला. यशपालचे वडील ज्ञानेश्वर पवार व आई मीना पवार हे शेतकरी दांपत्य. त्यांनी कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला.यशपाल पवार याचे एकत्रित कुटुंब आहे.

आजोबा वारकरी आहेत.यशपालचे दहावीपर्यंतचे शिक्षण अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यालयात झाले. अकरावी व बारावीपर्यंतचे शिक्षण खानदेश शिक्षण मंडळाच्या प्रताप महाविद्यालयात केले. पुणे येथील एस. पी. महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले. तेथूनच त्याने स्पर्धा परीक्षेचीही तयारी सुरू केली. स्पर्धा परीक्षेत दोनदा अपयश येऊनही त्याने प्रयत्न सोडले नाहीत.

प्रारंभी अपयश आले. मात्र खचून न जाता यशाला गवसणी घातली.गृहमंत्रालयात अधिकारी पदावर कार्यरत असतानाच त्याने ‘यूपीएससी’तर्फे घेण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची परीक्षा दिली. त्यात यशपाल आता असिस्टंट कमांडरपदी रुजू होणार आहे. त्याने ‌(सीएपीएफ) च्या असिस्टंट कमांडरच्या परीक्षेत ऑल इंडिया रँकिंगमध्ये ३३ वा क्रमांक पटकावला.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts