आपल्याला हलाखीच्या परिस्थितीत देखील स्वप्न पूर्ण करण्याची ताकद ही परिस्थितीच देत असते. याचे उदाहरण म्हणजे जुही कुमारी. जुहीच्या घरची परिस्थिती बेताची होती. वडिलांनी देखील मोठ्या कष्टाने मुलीचे शिक्षण पूर्ण केले. जुईने देखील परिस्थितीची जाणीव ठेवली.तिने अनेक अडचणींशी लढा देऊन सरकारी अधिकारी पद मिळवले आहे.
बिहारमधील सारण जिल्ह्यातील मधुरा खुर्द येथील रहिवासी जुही.जुही कुमारीचे वडील कांदे आणि बटाटे विकतात. बटाटे-कांदे विकून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते आपल्या धाकट्या मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा प्रयत्न करत होते.जुहीने मधौरामध्ये राहून इंटरमिडिएटपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी छपरा येथून ग्रॅज्युएशन केलं.त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.
सुरूवातीला तिला हे सारेकाही अवघड गेले. कारण, ती दोनदा मुख्य परीक्षेत नापास झाली होती, पण हिंमत हरली नाही. . तिला तिसऱ्या प्रयत्नात यश तर मिळालेच पण 307 वी रँकही मिळाली. जुहीची बिहार सरकारमध्ये ग्रामीण विकास अधिकारी पदासाठी निवड झाली आहे.मनात काही करण्याची जिद्द असेल तर यशाला गवसणी घालता येतेच.