⁠  ⁠

शेतकऱ्यांच्या पत्नीची उत्तुंग भरारी ; संसारगाडा सांभाळून देखील पोलीस दलात मिळवली PSI पोस्ट!

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC Success Story आपल्या इकडे सर्वसामान्यपणे असे म्हटले जाते की, लग्नानंतर एकदा संसारात पडलं की काही होतं नाही. पण शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या क्रांती पवार यांनी सोलापुरातील शेतकऱ्यांच्या पत्नीने एमपीएससी परीक्षेत ग्रामीण पोलीस दलातील महिला कॉन्स्टेबलने पीएसआय हे पद मिळवून मोठे यश संपादन केले आहे.

मोहोळ तालुक्यातील कुरुल कामती या गावातील शेतकरी किसनदेव जाधव हे शेती करतात. पत्नी क्रांती पवार जाधव या सोलापूर ग्रामीण पोलीस दलात महिला पोलीस कॉन्स्टेबल होत्या. मंगळवेढा पोलीस ठाणे इथे बदली झाली होती. पोलीस स्टेशन मिळाल्याने कामाचा व्याप मोठा होता. अभ्यासासाठी वेळ मिळत नव्हता. त्यासाठी क्रांती पवार यांनी मंगळवेढा पोलीस स्टेशनची ड्युटी बदलून गार्ड ड्यूटी मागितली होती. यामुळे २४ तास ड्यूटी केल्यानंतर २४ तास सुट्टी मिळायची. यातून मिळालेल्या वेळेत त्या अभ्यास करत होत्या. ही रोजची नोकरी चालू असताना, शेतकरी असलेल्या पतीने एमपीएससीचा अभ्यास करण्याचा आग्रह धरला.

संसार , नोकरी आणि अभ्यास कसा सांभाळायचा हा त्यांच्यापुढे प्रश्न होता? पण त्यांच्या सासरच्या मंडळींनी त्यांना मोलाचे प्रोत्साहन दिले. शिवाय सासू-सासरे, आई – बहीण, भाऊ यांनी देखील साथ दिली. मुलगा लहान असल्यामुळे चिंता असायची.पण घरचे त्याला सांभाळायचे.कुटुंबियांनी त्याचा अगदी व्यवस्थितपणे सांभाळ केल्यामुळे अभ्यासाकडे लक्ष देता आणि क्रांती या अभ्यासात झोकून देऊन सातत्य ठेवायच्या.

नोकरी करत अभ्यास करणं, फौजदार पदाची पोस्ट काढणं अवघड होतं, पण जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास करत, मनाशी खूणगाठ बांधलेल्या क्रांती यांनी पीएसआय होऊन दाखवलं.पोलीस कॉन्स्टेबलची ड्युटी करत करत पीएसआयची पोस्ट मिळवणं हा खरंच अवघड टास्क होता. पण क्रांती यांनी करून दाखवलं. इतकेच नव्हे तर त्यांनी मुलींमध्ये राज्यात २८वा क्रमांक मिळवला आहे.
मित्रांनो, आपण कोणत्या परिस्थितीतून आणि वातावरणातून येतो यापेक्षा आपण काय सिध्द करतो, हे महत्त्वाचे आहे.

Share This Article