Success Story : खरंतर, मासेमाऱ्यांचे आयुष्य हे रोल्लर कोस्टर सारखे असते. वातावरण बदलले की व्यवसायावर लगेच परिणाम दिसून येतो. अशाही परिस्थितीत ते कुटुंबासाठी अहोरात्र मेहनत करत असतात. अशाच कुटूंबातील पांरपारिक मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या उटंबर कोळीवाडा येथील एका मच्छिमाराच्या लेकीची ममताची मुंबई पोलिस दलात निवड झाली आहे.एका ग्रामीण भागातील युवतीची मुंबई पोलिस दलात वाहन चालक म्हणून झालेली निवड ही केवळ युवतींनाच दिशा देणारी आहे असे नव्हे तर सर्वांसाठीच एक आदर्श आहे.
ममता नरेश पाटील ही दापोली तालूक्यातील उटंबर कोळीवाडातील मूळ रहीवाशी आहे. तिच्या वडीलांचा पिडीजात हा पारंपारीक मासेमारीचा व्यवसाय असल्याने संपूर्ण कुटुंब या व्यवसायावर अवलंबून असते. अशा या मासेमारी कुटूंबातील ग्रामीण भागातील उटंबर कोळीवाडा येथे आपल्या कुटूंबासह राहणारी ममता पाटील.
ममता पाटील हीचे प्राथमिक शिक्षण उटंबर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले त्यानंतर माध्यमिक शिक्षण केळशी येथील परर्शुरामभाऊ दांडेकर विदयालयात झाले तर महाविदयालयीन बी. कॉम. पर्यंतचे शिक्षण तिने चिपळूण येथील गुरूकुल महाविदयालयात घेतले तर पुणे येथील एस.एन ॲकॅडमीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेतले. या युवतीच्या कुटंबात मासेमारी करणारा वडील नरेश पाटील, मासे व्रिकी करणारी आई शोभा पाटील. या दोघांनी देखील मुलांना उच्च शिक्षित केले. या चार बहिणी आणि आई वडील असे हे सहा जणांचे कष्टाळू कुटूंब या कुटूंबाची परिस्थिती तशी बेताचीच मात्र वडीलांनी काबाड कष्ट करत आपल्या मुलींना शिक्षित करण्याचे काम केले आहे.
ममता पेक्षा वयाने मोठी असलेल्या एका बहीण नर्सिंग पूर्ण केले. त्यानंतर ममता जिची मुंबई पोलीस दलात वाहन चालक या पदावर निवड झाली. तिसऱ्या बहीणीचे ग्रॅज्युएशनचे अंतिम वर्ष आहे तर छोटया बहीणीने आता अकरावीत प्रवेश घेतला आहे. घरात चारही मुली तरी त्यांना नाकारले नाहीतर स्वीकारले आणि शिक्षणाची वाट दाखवली. ममताने देखील खूप कष्ट केले. सर्वसामान्य कुटूंबातील एका युवतीने संघर्ष करत ज्या पोलीस दलाची जगात ख्याती आहे त्या मुंबई पोलीस दलात आपले स्थान निश्चित करत आपल्या आई वडीलांच्या काबाड कष्ट आणि मेहनतीचे चीज केले आहे.