---Advertisement---

लेकीने वडिलांचे केले स्वप्न पूर्ण; सुनीताची झाली पोलिस दलात भरती!

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Success Story गावाकडच्या खूप मुलींचे स्वप्न असते की आपल्याला वर्दी मिळाली पाहिजे. त्यामुळे, पोलिस, सैन्यदलात भरती होण्यासाठी अभ्यास व मैदानी तयारी सातत्याने करत असताना‌ दिसतात. हल्ली खूप मुलींची या क्षेत्रात भरती देखील झाली आहे. पण या प्रवासात काहीच जण यशस्वी होतात. त्यापैकी एक देवळा तालुक्यातील सांगवी या गावातील सुनीता अशोक देवरे.अशोक देवरे यांची मुलगी सुनीता हिची मुंबई पोलिस दलात निवड झाली आहे.

सुनीताचे प्राथमिक शिक्षण जि.प. शाळा, सांगवी येथे तर माध्यमिक शिक्षण हे कुंभार्डे येथे झाले. त्यानंतर तिने तालुक्याच्या ठिकाणी पदवीचे शिक्षण घेतले. तिच्या घरची परिस्थिती प्रतिकूल आणि बेताची असताना देखील मुलींनी शिक्षण पूर्ण करत सरकारी नोकरी करावी, असे तिच्या आई – वडिलांनी स्वप्न उराशी बाळगले. यासाठी त्यांनी सुनीताला पोलिस भरतीसाठी पाठवले. मुलीने पोलिस भरतीची तयारी करणे तितके सोपे नव्हते.सुनीताला पोलिस भरतीसाठी आर्य करिअर ॲकॅडमीचे संचालक विक्रांत भामरे यांचे मार्गदर्शन घेतले. तिने जोमाने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली.

---Advertisement---

खरंतर, सुरुवातीला सुनीताची स्टाफ सिलेक्शनमध्ये निवड झाली. मात्र कागदपत्रांचा अडथळा आल्यामुळे तिथली संधी हुकली होती. मात्र तिने जिद्द सोडली नाही. सुनीता हिने खाकी वर्दी घालून सेवा देण्याचा निर्धार केला.प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सुनीता हिने पोलिस भरतीचे सर्व निकष पूर्ण करत पोलिस दलात भरती होत वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. तिचा हा प्रवास ग्रामीण – गरजू मुलींसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts