संतोषने लहानपणापासून देशाची सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यासाठी तो अहोरात्र मेहनत करत होता. संतोष निफाडे हा मूळचा निफाड तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक या गावचा. तो शालेय जीवनापासून शिक्षणात हुशार होता.
पण इतर आर्थिकप्राप्तीची नोकरी न स्वीकारता देशसेवा करण्याचा त्याचा ठाम निर्धार घेतला. त्यास कुटुंबाने देखील आधार दिला. या काळात त्याने देशसेवेचे आव्हान पेलत अंतर्गत परीक्षा देत निवृत्तीपर्यंत लान्सनायक, हवालदार या पदापर्यंत मजल मारली. त्यानंतर निवृत्ती न स्वीकारता नवीन आव्हान पेलत एनएसजी कमांडो होण्याचे स्वप्न मनाशी बाळगत एनएसजी ट्रेनिंगसाठी दिल्ली गाठली.
ट्रेनिंगमध्ये मध्यरात्री साडेतीनला उठून रात्री बारा किंवा एकपर्यंत, असे सुमारे २० तास ट्रेनिंग केले. रात्री केवळ केवळ साडेतीन तास विश्रांती मिळत असे. त्यात संपूर्ण भारतातून ६५० पैकी २९५ उत्तम सैनिकांमधून जे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून विविध परीक्षांचे स्तर पूर्ण केले. अखेर, या प्रयत्नांना यश आले. देशसेवेची अतीव ओढ व मेहनत याची सांगड घालत शेतकरी कुटुंबातील सैनिक संतोष सखाहरी निफाडे एनएसजी कमांडो बनला आहे.