प्रणवी झाडगे या कृषीकन्येची घरची परिस्थिती जेमतेम बेताचीच होती…आई आणि वडील गावातील शेतकऱ्यांच्या शेतात मोलमजुरीचे काम करतात. अशा परिस्थितीत तिने पोलिस होण्यासाठी धडपड केली आणि ती यशस्वी झाली. हल्ली गावातील अनेक मुले व मुली पोलिस भरतीसाठी प्रयत्न करत आहेत. तसेच ह्याच परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र मुंबई पोलीस पदाला प्रणवीने गवसणी घातली आहे.
तिचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नाथाचीवाडी येथे पूर्ण झाले. माध्यमिक शिक्षण माटोबा विद्यालय नाथाचीवाडी येथे आणि त्यानंतर विद्यालयीन शिक्षण भैरवनाथ विद्यालय खुटबाव येथे पूर्ण केले. तिला लहानपणापासूनच वर्दीचे आकर्षण होते. त्यासाठी तिची मेहनत पण बरीच होती. म्हणूनच तिने एका अकादमीला पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेतले.
आईने -वडिलांनी काबाडकष्ट करत मुलांना घडविले. त्या कष्टाची जाण प्रणवीने सतत ठेवली. आई आणि वडिलांनी मुलगी पोलीस बनली पाहिजे याच्यासाठी तिला कशाची कमी पडू नाही दिली. तिने देखील तेवढेच कष्ट घेतले. नाथाचीवाडी या छोट्याशा गावातील प्रणवी संजय झाडगे ह्या गरीब शेतकरी मजूर कुटुंबातील या मुलीने मुंबई पोलीस भरतीमध्ये बाजी मारत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे