कामगाराचा लेक अधिकारी होतो तेव्हा.. वाचा विक्रीकर अधिकारी अक्षयचा प्रवास
आपली परिस्थिती कोणतीही असली तरी जिद्द उराशी असेल तर नक्कीच यश मिळते. अक्षयचे वडील परशुराम पाखरे हे सेंट्रिंगचे काम करतात. कामगारांचे आयुष्य हे जगत असताना देखील त्यांनी मुलाला उच्च शिक्षित केले.अक्षय देखील शिक्षण घेताना स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याचा अभ्यास सुरू होता. पॉलिटिकल सायन्स विषय घेऊन तो पदवीधर झाला. पुढे त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.
परिस्थितीचे चटके आणि मार्गदर्शनाचा अभाव यामुळे त्याला माघार घ्यावी लागली.पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर अधिकारी, दुय्यम निबंधक या परीक्षांचा त्यांनी अभ्यास सुरू केला. दररोज नित्यनेमाने वाचन व लेखन यावर अधिक भर दिला. आपल्याला परिस्थितीसोबत सामना करत लढाई जिंकायची आहे हे त्याने ठरवले होते.
ते प्रत्यक्षात करून देखील दाखवले. त्याने अजिबात खचून न जाता पुन्हा त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यास सुरुवात केली. नोव्हेंबरमध्ये ही परीक्षा झाली. नुकताच या परीक्षेचा निकाल लागला. त्यांची विक्रीकर अधिकारी या पदावर नियुक्ती झाली. तसेच तो मागासवर्गीय समाजात राज्यात तिसरा आला.केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा जिंकण्याचा त्याचा मानस होता. त्यासाठी त्याची धडपड चांगलीच होती. यात तो खऱ्या अर्थाने सफल झाला.